+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिले-कपिल पाटील adjust आमदार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार, हातकणंगलेत अपक्ष उमेदवारी adjustगोकुळमार्फत सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा adjustशिक्षक बँकेतील राजकारणाचे कवित्व ! एकमेकांच्या कामकाजाचा पर्दाफाश ! adjustगोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री adjustरोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम adjustसभेच्या मान्यतेने अमृत संजीवनी योजना, विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ- अध्यक्ष राजेंद्र पाटील adjustनिवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा-हसन मुश्रीफ adjustशक्तिपीठ महामार्ग धनदांडग्यासाठी, शेतकऱ्यांची बैलगाडी त्यावर धावणार का ? - संजय घाटगे adjustटेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार - जिल्हाधिकारीसो अमोल येडगे
Screenshot_20240226_195247~2
schedule31 Mar 24 person by visibility 77 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातील शिक्षक डॉ. नगिना सुभाष माळी यांना सोलापूर येथील सर फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा इनोव्हेशन पुरस्कार जाहीर झाला आहे. मे २०२४ मध्ये होणाऱ्या एज्युकेशनल इनोव्हेशन परिषदेत पुरस्कार वितरण होणार आहे.
सोलापूर येथील 'स्टेट इनोव्हेशन अॅन्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), महाराष्ट्र या संस्थेतर्फे 'राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा-२०२३' आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी डॉ. नगिना माळी यांनी ‘प्रभावशाली अध्ययन-अध्यापन प्रतिमान: एक नाविन्यपूर्ण उपक्रम’ हा नवोपक्रम सादर केला. या नवोपक्रमाला 'सर फाऊंडेशन एज्युकेशनल इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड-२०२३' पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 या पुरस्काराचे वितरण मे २०२४ मध्ये विशेष राष्ट्रीय एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्समध्ये करण्यात येणार आहे. परिषदेत विविध विषयांवर शैक्षणिक मंथन होणार आहे. शिक्षणतज्ज्ञांचे व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण असे कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती फौंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे यांनी दिली आहे.