Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफपदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद, शिवसेना ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर हल्लाबोल ! ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई ! !सत्तेचा घटक असतानाही शिक्षकांसाठी भांडलो, महाविकास आघाडीच्या कालावधीत जयंत आसगावकरांनी कुठले प्रश्न सोडवले ? कौस्तुभ गावडेंचा सवालकेआयटीच्या २६ विद्यार्थ्यांना टाटा पॉवरमध्ये ७ लाखांचे पॅकेजना रस्ते - ना गटारसाठी, आमदार फंडाचा निधी शाळांसाठी ! पाच जिल्ह्यातील शाळांना सात हजाराहून अधिक शैक्षणिक साहित्य वाटप ! !पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचा आज प्रचार मेळावाउद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृ‌शोक

जाहिरात

 

डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

schedule23 Oct 24 person by visibility 807 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील  यांचा ९० वा वाढदिवस मंगळवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. 
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दादासाहेबांनी मंगळवारी ९१ व्या वर्षात पदार्पण केले. यावेळी त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तके गरजवंत विद्यार्थ्यांना वितरीत केली जाणार आहेत. यावेळी  शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, डॉ. विजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, अजिंक्य डी. पाटील, सुप्रिया पाटील, डॉ. नंदिनी पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा,  राजश्री काकडे, वैजयंती संजय पाटील,  शिवानी पाटील,  पूजा पाटील,  मेघराज काकडे, डॉ. रष्मित चोलेरा, डॉ.पालशेतकर, आमदार ऋतुराज पाटील,  पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील,  स्मिता योगेश जाधव, सोमनाथ पाटील, भरत पाटील, करण काकडे, चैत्राली काकडे, स्नेहल समीर मुळे यांच्यासह सुना, जावई, नातसुना-जावई, नातवंडे- पणतवंडे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
   माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम  यांनी फोनद्वारे जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील,  अजित पाटील बेनाडीकर, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे डॉ. डी. आर. मोरे, डॉ. व्ही. एम. पाटील, जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रमा बोंद्रे, अभिषेक बोंद्रे, अण्णासाहेब चव्हाण पाटील, धैर्यशील पाटील, आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes