शरद पवार गटाचे कोल्हापूर दक्षिणमध्ये घरोघरी राष्ट्रवादी अभियान
schedule04 Dec 23 person by visibility 379 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (शदर पवार गट) पक्षातर्फे घरोघरी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी' या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार हे अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानच शुभारंभ झाला. प्रतिभानगर येथील मारुती मंदिरापासून सुरुवात झाली. ‘मी महाराष्ट्रवादी' नावाचे स्टीकर त्यांच्या घराच्या मुख्य दर्शनी भागावर लावण्यात आले. यावेळी, पोवार गल्ली, शाहूनगर चौक, व इतर गल्ल्या असे तीनशे ते चारशे घरापर्यंत हे अभियान पोहोचवण्यात आले.
अभियान यशस्वी करण्यासाठी अनिल घाटगे, नितीन पाटील, महादेव पाटील, नागेश जाधव, गणेश नलवडे, यांनी परिश्रम घेतले. यावेळी रामराजे कुपेकर, पद्मजा तिवले, सुनील देसाई, उमेश पोवार, गणेश जाधव,निलेश मछले, मुसा कुलकर्णी, फिरोज सरगुर, सादिक आतार, अरुणा पाटील, सरोजिनी जाधव, फिरोज खान उस्ताद, राजेंद्र ओंकार, राजू मालेकर, राजवर्धन यादव, नागेश परांडे, अमोल जाधव, नितीन पेंटर, आदित्य नीलकंठ, पप्पू जाधव, अनिल कलकुटकी, गणपत पोवार, चंद्रकांत नलवडे, बंटी नलवडे, सिद्धार्थ घोडेराव, हर्ष साळोखे, रियाज आतार ,संदीप घाटगे , भूषण पोतदार, निवास गायकवाड, गौरव कांबळे, महेश नलवडे ,सनी गायकवाड, संदीप साळोखे उपस्थित होते.