निगवे दुमालातील पाटील ओढा येथे श्रमदानातून बंधारा
schedule14 Oct 23 person by visibility 551 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे वसुंधरा अभियान अंतर्गत वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात झाली. पाटील ओढा येथे पहिला बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला.या श्रमदानामध्ये जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख, सरपंच, सदस्यासह नागरिकांनी सहभाग घेतला. निगवे ग्रामपंचायत व माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालय रजपुतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान उपक्रमाचे आयोजन केले होते.
शनिवारी (१४ ऑक्टोबर) रोजी हे अभियान झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव साहेब, सरपंच कोमल जासुद, उपसरपंच, सर्व सदस्य, गट विकास अधिकारी विजय यादव, सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव, विस्तार अधिकारी संदेश भोईटे, ग्रामविकास अधिकारी सजय शिंदे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने ‘माझी वसुंधरा...’ही शपथ घेण्यात आली.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गावातील ओढ्यावर वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला यामुळे पाणी टंचाई वर मात करून ओढ्यालगत असलेल्या शेती,विहीरी, यांच्या पाणी पातळी वाढविण्यासाठी वनराई बंधारा एक स्तुत्य उपक्रम गावकरी व विद्यार्थ्यांनी राबवून सर्वांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी कौतुक केले. यावेळी माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालय रजपूतवाडी प्राचार्य शिवाजी कोरवी, संस्था कार्यवाह प्रा. सुनील भोसले, प्राथमिकचे मुख्याध्यापक कृष्णात पाटील, ,प्रदीप उबाळे, आनंदा वाघमोडे, प्रशांत भोसले, निशिगंधा नलवडे, सारीका आडके, सुजाता सुरवसे आदी उपस्थित होते