Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमधून सुसंस्कारी वकील-न्यायाधीश निर्माण होतील –प्राचार्य अभयकुमार साळुंखेआयुक्त अॅक्शन मोडवर, नेत्रदीप सरनोबत, रमेश कांबळेंची खातेनिहाय चौकशी ! तीन अधिकारी निलंबित ! !प्रत्येक तालुक्यातील एका गावात प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र शिक्षक बदली पोर्टलमधील अअनियमितता दूर करा, अन्यथा कोर्टात दाद मागणार : पुरोगामी शिक्षक संघटनापालक सहभागातून वर्गाचा कायापालट, नेहरुनगर विद्यामंदिरातवारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्केमला पैसे खायला आवडतात-माझं पगारात भागत नाही : महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आपचे आंदोलनन्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहातसिद्धगिरी हॉस्पिटलचा सेवाभाव, एक लाखात एंडोस्कोपिक कि - होल शस्त्रक्रिया शिक्षकांच्या चौथ्या टप्प्यातील बदलीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध

जाहिरात

 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डीवाय पाटील हॉस्पिटलचा सन्मान

schedule14 Jun 25 person by visibility 329 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लाखो रूग्णापर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या  कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी केंदीय मंत्री  पटेल यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला. ‘नवभारत ग्रुप’चे संचालक वैभव माहेश्वरी, रुबी क्लिनिकचे सीईओ बेहराम खुदाई आदी उपस्थित होते. मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या ८ व्या ‘हेल्थ केअर समिट’ मध्ये हा  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या  नेतृत्वाखाली हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारावर उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यांचे आयोजन केले जाते. 

कोरोना महासंकटात डॉ. संजय डी. पाटील यांनी संपूर्ण रुग्णालय कोरोना सेवेसाठी समर्पित केले होते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये सर्व आजारावर मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे.  या सर्व कार्याची दखल घेऊन हॉस्पिटलचा ‘बेस्ट हॉस्पीटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

 या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले,  अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, आयक्यूएसी डायरेक्ट डॉ. शिंपा शर्मा,  वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील व मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे सर्व प्राध्यापक, डॉक्टर्स, परिचारिका, सहाय्यक, व कर्मचाऱ्यांचे  अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes