Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप, महापालिकेच्या निवडणुकांना ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन ! मुदतवाढीवरुन सुप्रीम कोर्टाने फटकारले ! !ठठ थथथरोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे हॉटेल सयाजीत यामिनी प्रदर्शनजिल्ह्यात सतरा सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा पंधरवडा –सीईओ कार्तिकेयन एसदेशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे स्वराज्य- सुराज्याच्या घडणीचे  शिल्पकार :जिल्हाधिकारी अमोल येडगे अभाविपचे विद्यापीठात आंदोलन, काही कार्यकर्ते कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसले वंदूरच्या पाटील बंधूचा सेंद्रीय गूळ उद्योग ! परराज्यातही पसरला गोडवा, शंभर रुपये किलोने विक्री !महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होणारपाच कोटी रुपयांच्या बक्षीसाचे पंचायतराज अभियान हे देशातील एकमेव-जयकुमार गोरेबॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला केंद्रीय मंत्र्यांकडून पुरस्कार प्रदान

जाहिरात

 

महाविद्यालयीन विद्यार्थी सिद्धेश रेडेकरचा अपघाती मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का - बुधवारी रक्षाविसर्जन

schedule22 Apr 25 person by visibility 618 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वडील अभियंता, बांधकाम व्यावसायिक. वडिलासारखेच आपणही बांधकाम क्षेत्रात करिअर करायचे म्हणून तो ही आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता. त्याला रेसिंगची आवड. बाइक रायडर म्हणून त्याची ओळख. सुट्टीदिवशी मित्रासोबत पर्यटनस्थळांची सैर करायचा.रविवारी, २० एप्रिल २०२५ रोजी आजरा तालुक्यातील माद्याळ येथे मोटारीशी त्याच्या स्पोर्टस बाइकची धडक बसून झालेल्या अपघातात २१ वर्षीय सिद्धेश विलास रेडेकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. उमद्या तरुणाचा अकाली अंत झाला. आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. ही हृदयद्रावक व मनाला चटका लावणारी घटना. कुटुंबांसाठी तर हा मोठा धक्का.

सिद्धेशच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे रक्षाविसर्जन करण्यात येणार आहे. रेडेकर कुटुंबीय हे माळी कॉलनी टाकाळा येथील. ते, मूळचे करवीर तालुक्यातील नंदगाव येथील. अभियंता विलास रेडेकर हे महापालिकेत अभियंता म्हणून काम केले होते. नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेत त्यांनी बांधकाम व्यवसायत पाऊल टाकले.या क्षेत्रात जम बसविला. त्यांचा मुलगा सिद्धेशही बांधकाम क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील होता. यासाठी आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता.

पर्यटनस्थळी सैर करण्याची आवड. बाइकवरुन सुट्टीदिवशी मित्रासोबत सैर करायचा. रेसिंगची हौस असल्यामुळे जिल्हयाच्या विविध भागत बाइकवरुन सैर ठरलेली. रविवारी (२० एप्रिल २०२५) , तो मित्रासोबत बाइकवरुन आंबोलीकडे रवाना झाला. आंबोलाहून परत येत असताना माद्याळ गावानजीक काही अंतरावर त्याच्या बाइकची आणि मोटारीची धडक झाली. हेल्मेटही उडून काही अंतरावर पडले. या अपघातात सिद्धेश गंभीररित्या जखमी झाला. अपघात इतका भयानक होता की, जागेवरच सिद्धेशचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने रेडेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes