Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासबाग मैदानाची स्वच्छता, दसऱ्यानंतर खासदार - आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शनेसंजय घोडावत विद्यापीठाचा सोळा ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ गोकुळच्या व्यासपीठावर आबिटकर –के. पी. एकत्र !  महायुतीच्या विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल ! !शिक्षकांशी संवाद, प्रश्नांची उकल! कौस्तुभ गावडेंची शहरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी! !आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोलगोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

मिरवणुकीत लेसर लाइटसवर बंदी, पोलिस अॅक्शन मोडवर

schedule12 Sep 24 person by visibility 1002 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लेसर लाइटसचा संभाव्य धोका विचारात घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीत त्यावर बंदी घालण्यात आली. अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइटस वापरावर बंदी आदेश लागू केला आहे.त्या संबंधी पोलिसांना सूचना केल्या आहेत. तेव्हा गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइटसचा वापर करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे.
  लेसर लाइटसमुळे डोळयावर दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. गणेश आगमन मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटसचा वापर केला. या लाइटसमुळे अनेकांच्या डोळयाला इजा झाल्याच्या तक्रारी आहेत. पोलिस प्रशासनाकडे तक्रारी झाल्या. मिरवणुकीत लेसर लाइटसवर बंदी घालण्याची मागणी पुढे आली.
लेसर लाइटसचा धोका विचारात घेऊन अप्पर जिल्हा दंडाधिकारी तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाइटसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बारा ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत लेसर लाइटस वापरावर बंदी आहे. या आदेशाचे ज्या गणेश मंडळाकडून उल्लंघन होईल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes