भाजपा कार्यकर्त्यांचा मिरजकर तिकटीला जल्लोष
schedule05 Dec 24 person by visibility 67 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच कोल्हापुरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मिरजकर तिकटी या ठिकाणी जल्लोष करण्यात आला. शपथविधी सोहळा पाहण्यासाठी भाजपतर्फे प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.
भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत एकमेकांना मिठाई भरून हा आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी राहुल चिकोडे, गायत्री राऊत, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, भाऊ कुंभार, अमोल पलोजी, गणेश देसाई, विजय खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, अतुल चव्हाण, अवधूत भाट्ये, धनश्री तोडकर, रश्मी साळोखे, सुजाता पाटील, श्वेता गायकवाड, अमर साठे, नचिकेत भुर्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.