आशा वर्कर्सचा दसरा चौकात ठिय्या आंदोलन
schedule06 Nov 23 person by visibility 295 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन तर्फे सोमवारी दसरा चौक येथे आंदोलन करण्यात आले. आशा वर्कर्संनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. जवळपास एक तासहून अधिक वेळ आंदोलन झाले. आशा वर्कर्सनी मराठा आरक्षणलाही पाठिंबा दिला.
"गटप्रवर्तकांचे समायोजन करा, आशा व गटप्रवर्तकांवरील ऑनलाइन कामाची सक्ती पूर्णपणे बंद करा." या प्रमुख मागण्यासाठी आशा वर्कर्संनी १८;ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवारी सहा नोव्हेंबर रोजी दसरा चौक येथे निदर्शने करण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये आशा वर्कर्सचा मोठ्या संख्येने सहभाग होता. दुपारी एक वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. दरम्यान पोलिसांनी वाहतुकीसाठी एक मार्ग चालू ठेवला होता.