पाच लघु पाटबंधारे तलावातील पाणी उपसावर बंदी
schedule30 Nov 23 person by visibility 216 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पंचगंगा पाटबंधारे उपविभागांतर्गत करवीर तालुक्यातील कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगाव व दऱ्याचे वडगाव लघु पाटबंधारे तलाव येथील जलाशयातील पाण्यावर शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी करण्यात आली असल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता संदिप दावणे यांनी दिली.
जलाशयातील पाण्यावर व डीपीवर खालील नमुद कालावधीसाठी शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी व उपसा कालावधी पुढीलप्रमाणे- उपसा बंदी कालावधीतील कार्यवाहीचा भाग कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, दऱ्याचे वडगाव ल.पा. तलाव जलाशय व धरण पायथ्यापासून बोलोली को.प.बंधाऱ्यापर्यंत हरवळ नाल्यावर तसेच उपवडे जलाशयातून शेतीसाठी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी कालावधी खालीप्रमाणे - उपवडे ल.पा. तलाव जलाशय, कणेरीवाडी ल.पा.तलाव जलाशय, कंदलगाव ल. पा. तलाव जलाशय, राजाराम ल.पा. तलाव जलाशय व दऱ्याचे वडगाव ल.पा. तलाव जलाशयातील उपसा बंदी कालावधी- दि. 3 डिसेंबर 2023 पर्यंत, दिनांक 8 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2023 व दिनांक 22 डिसेंबर ते पुढील आदेशापर्यंत राहणार आहे.
उपसाबंदी अंमलात आणावयाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांनी नमुद केलेल्या उपवडे ल.पा. तलाव येथील जलाशयातील सर्व तीरावर नमुद केलेल्या कालावधीसाठी शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत उपसायंत्राची तारामंडळे काढून घ्यावीत. तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उपसा यत्रांना सिल करावे व आदेशातील उपसा बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल.