+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसंयमाला मर्यादा,२४ तासात हल्ले थांबवा ! नाही तर मी बेळगावमध्ये जाणार !! adjustबेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड, सीमावाद चिघळला adjustराजेश क्षीरसागर फौंडेशनतर्फे सौंदतीत भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा-अल्पोपहार वाटप. adjustकोल्हापुरात जानेवारीत निमंत्रितांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धा adjustडॉ. जयसिंगराव पवार यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान adjustपॅरा ओपन टेबल टेनिस स्पर्धेत विवेक मोरे तृतीय adjustशाहू गोल्ड कप, फुटबॉल अॅकॅडमीची मालोजीराजेंकडून घोषणा adjustमालोजीराजे, मधुरिमाराजे यांच्या हस्ते केएसए लोगोचे अनावरण adjustशिक्षक बदलीसाठी संदर्भ दिनांक ३० जून २०२३ गृहीत धरावा ! पुरोगामी शिक्षक संघटनेच्या राज्य सभेत ठराव !! adjust केआयटीत संवाद आयएएस अधिकाऱ्यांसोबत, उलगडली प्रशासक कादंबरी बलकवडेंची वाटचाल
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule01 Oct 22 person by visibility 271 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
गुप्तधनाच्या लालसेने महिलेने मांत्रिकाकडे तगादा लावला. मांत्रिकांने मात्र त्या महिलेच्या दागिन्यावर डोळा ठेवला. त्यातच महिलेची दुसऱ्या मांत्रिकाशी मैत्री वाढू लागल्यानंतर त्याचा राग अनावर झाला. आणि त्यातून डोक्यात वीट मारून त्याने महिलेचा खून केला. करवीर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरती अनंत सामंत ( रा. 45, रा. जैन मंदिर शुक्रवार पेठ) या महिलेच्या खुनाचा छडा लावला. मांत्रिक नामदेव पोवार (वय 34 राहणार जोगेवाडी, ता. राधानगरी ) याला अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली.
करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी तपासाची माहिती दिली. पाडळी खुर्द येथे शुक्रवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाजवळ असलेल्या ओळखपत्रावरून आरती आनंद सामंत या खून झालेल्या महिलेची ओळख पटली. डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच गळ्यातील आणि हातात दागिने गायब झाले होते. पोलिसांनी सामंत यांच्या मोबाईल लोकेशन वरून तपास सुरू केला. त्यानंतर संशयित नामदेव पोवार याला राशिवडे येथील बिरोबा मंदिरात ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता पवार याने खुनाची कबुली दिली. सामंत यांना स्वप्नात त्यांच्या घरात गुप्तधन असल्याचे दिसून येत होते म्हणून त्यांनी काही मांत्रिकांच्याकडे विचारणा केली होती. शिरोली पुलाची येथील मांत्रिकाकडे त्या जात होत्या. त्यातून त्यांची मैत्री वाढली होती ‌  त्यानंतर त्यांनी मांत्रिक नामदेव पवार यांची भेट घेतली. त्यांनी मांत्रिकीकडे गुप्तधनाबाबत तगादा लावला. त्यातून त्यांची मैत्री ही वाढली. सामंत याची शिरोली येथील मांत्रिकासोबत मैत्री वाढली होती. तसेच त्यांच्या दागिन्यावरही पोवारांचा डोळा होता. त्यातून पोवार यांनी सामंत यांचा डोक्यात वीट मारून खून केला. त्यांच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल चोरून गेला. पोलिसांनी मोबाईल लोकेशन लोकेशन वरून नामदेव पोवारला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.