Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या दिनदर्शिकेतून उलगडतोय दुग्ध व्यवसाय,अद्ययावत माहिती  दूध उत्पादकांसाठी उपयुक्तएसफोरए लढविणार महापालिका निवडणूक - राजू मानेमंडल अधिकाऱ्याला २७ हजाराची लाच घेताना अटकमहाविकास आघाडी की स्वतंत्र ? शिवसेना ठाकरे पक्षाचा बुधवारी निर्णय, अरुण दुधवडकर करणार सतेज पाटलांशी चर्चाशिवाजी विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलगुरु निवडीसाठी प्रक्रिया सुरू, २७ जानेवारीपर्यंत मागविले अर्ज राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ४९ नगरसेवकांची  निर्दोष मुक्तताइंडिया आघाडीतून आप बाहेर, महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारामहापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात निश्चित , कोल्हापूर- इचलकरंजीत महाविकास आघाडी म्हणून लढणार : सतेज पाटील संगीता पोवार चालविणार पोवार कुटुंबीयांचा समाजकार्याचा वारसा निकालानंतर कागलात वादाचे फटाके, मंडलिक-मुश्रीफ आमनेसामने !

जाहिरात

 

तीन टर्म आमदार, विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पेलल्या,पालकमंत्रीपद आम्हाला मिळावे- राजेश क्षीरसागर

schedule28 Nov 24 person by visibility 1287 categoryराजकीयसंपादकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आमदारकीची माझी ही तिसरी टर्म आहे. गेली पाच वर्षे माझी राज्य  नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या मंत्रीपदाच्या दर्जाचा  कार्यभार मी व्यवस्थित सांभाळला आहे. यासह मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून  शाश्वत परिषदेसारख्या  संकल्पनांद्वारे  कोल्हापूर जिल्ह्यात  विकासाची नवी वाटचाल सुरू केली आहे. यामुळे पालकमंत्री पद आम्हाला मिळावे यासाठी आग्रही आहे.’अशी भूमिका आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडली आहे.

क्षीरसागर यांनी म्ह्टले आहे, ‘महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत  काॅमन मॅन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला , त्यामुळे महायुतीचा विजय झाला.  शिंदे यांनी मोदी शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य असेल सांगितल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग आणखी सुखकर झाला आहे.शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मंत्रिपद मिळतील अशी खात्री आहे. शिवसेना स्थापन झाल्यापासूनचा मी कार्यकर्ता, बाकीचे आता आलेली आहेत. मी केडरमधील कार्यकर्ता , त्यामुळे मला मंत्रिपद मिळेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

१० पैकी १० जागा महायुतीच्या येणार हे मी आधी पासून म्हणत होतो. लोकसभेनंतर हिंदू देखील एकवटले आणि त्यांनी दाखवून दिले एकत्र आल्यावर हिंदू काय करू शकतो. अंबादास दानवे यांच्या वक्तव्याला जास्त सिरियस घेण्याची गरज नाही.. त्यांनी स्वतःची माती करून घेतलीय.. शिवसेनेचा १ खासदार ३ आमदार आणि २ पाठिंबा असलेले आमदार आहेत.ज्याचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद फॉर्मुला आहे याकडेही क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes