Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोकडॉ विलास व्ही. कारजिन्नी यांना सीनियर इंजिनिअर ऑनर २०२६ पुरस्कारलिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेट

जाहिरात

 

तीन महिन्यात तीन अध्यक्ष, गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीप मालगावे

schedule09 Jul 26 person by visibility 234 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या तीन महिन्यात प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद तीन वेळा बदलले. मे महिन्यात गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत संपली. यानंतर गोकुळवर पाच सदस्यीय प्रशासक मंडळ नेमले. संजयकुमार सुद्रिक हे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष होते. दरम्यान सुद्रीक यांनी प्रकृतीच्या कारणास्वत प्रशासकीय कामातून मुक्त करावे अशी मागणी केली. त्यांच्या पत्रानुसार त्यांच्याकडील कार्यभार काढून घेत सदस्य सुनील धायगुडे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबादरी सोपविली.  दरम्यान धायगुडे यांच्याकडे जनगणनेसह अन्य कामे असल्यामुळे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास तयारी दर्शविली नाही. यामुळे प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रदीप मालगावे यांच्याकडे सोपविली आहे. प्रशासकीय मंडळात आता अध्यक्ष मालगावे, सदस्य सुनीलकुमार धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर यांचा समावेश आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक, अवसायनात निघालेल्या दूध संस्था यावरुन सातत्याने आंदोलने झाली. काहींनी प्रशासकीय मंडळाला लक्ष्य केले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes