Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

जिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक सदस्यांसोबतच, लवकरच निवडी होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

schedule01 Jun 26 person by visibility 240 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक ही सदस्यांना घेऊनच होईल’अशी स्पष्ट  ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या या ग्वाहीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य यांची जिल्हा नियोजन समितीवर लवकरच निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले.

 पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी, एक जून २०२६ रोजी झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी महापालिकेतील नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांची जिल्हा नियोजन समितीवर कधी निवडी होणार असा प्रश्न केला. त्यावर पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थेतंर्गत नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका एका नंतर एक झाल्या. या निवडणुकीच्या कालावधीत जवळपास चार महिन्याचा कालावधी गेला. यामुळे सदस्यांच्या निवडी राहिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या पुढील बैठकीअगोदर सदस्यांच्या निवडी केल्या जातील. सदस्यांना घेऊनच जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल.तसेच महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीही नजीकच्या काळात होतील. महायुतीमध्ये समन्वय समितीत सहा सदस्य आहेत. या समन्वय समितीतंर्गत महामंडळावरील निवडीसंबंधी चर्चा झाली आहे.’ पत्रकार परिषदेला आमदार राजेश क्षीरसागर, आमदार शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes