Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर पुरस्कार प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना जाहीरबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सतंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्केमार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ

जाहिरात

 

शिक्षक  - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही या पद्धतीने कामकाज करा, शिक्षक आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

schedule05 Jun 26 person by visibility 290 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  शंभर पटाच्या आतील विद्यार्थी संख्येच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना संरक्षण मिळावे. त्यांना स्टार देऊन मुख्याध्यापकांच्या निवृत्तीपर्यंत पद संरक्षित राहावे, इयत्ता नववी व दहावी या दोन्ही वर्गातील पटसंख्या वीस असल्यास तीन शिक्षक मंजूर करावेत अशा प्रमुख मागण्यासह अन्य मागण्या शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी करून कोणत्याही शिक्षक व कर्मचारी यांच्यावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची मागणी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्याकडे या प्रसंगी मागणी केली.
   शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांची बैठक आयोजित केली होती.  शिक्षण उपसंचालक  कोळेकर यांच्यासह तीन जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक लेखाधिकारी यांची उपस्थिती होती. तीनही जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना ,  शिक्षकेत्तर सेवक संघटना आणि संस्था चालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी आपआपल्या  जिल्ह्यातील शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, मेडिकल बीले, पदोन्नती प्रस्ताव, सेवानिवृत्ती प्रस्ताव, अर्धवेळ शिक्षकांचे मान्यता प्रस्ताव, अनुकंपा मान्यता प्रस्ताव, बदली प्रस्ताव, रजा रोखीकरण प्रस्ताव, डीसीपीएस योजनेतील प्रस्ताव यासह अनेक प्रलंबित मागण्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या.
        वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे न पाठविता लेखाधिकारी यांच्याकडे पाठवावेत, जिल्हातंर्गत बदली मान्यतेचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे मान्यतेस न पाठविता वेतनपथक अधिक्षक यांच्याकडे पाठवावेत, अनुंकपा नियुक्ती मान्यता प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनीच मान्यता द्यावी, योजना शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविण्याची गरज नाही, आपल्या विभगामध्ये अनाधिकृत शाळा आहेत त्या शाळांचा शोध घेऊन त्यांची यादी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिर करून संबंधित शाळावरती कारवाई करावी अशा आग्रही मागण्या संघटनांनी केल्या.
 सभेस सहशिक्षण संचालक गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सांगली माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे,विशाल दशवंत उपशिक्षणाधिकारी सांगली, वेतन पथक कोल्हापूर अधिक्षक उदय सरनाईक, कोल्हापूर माध्यमिक अधिक्षक प्रविण फाटक, कोल्हापूर लेखाधिकारी नंदकिशोर भंडारे, प्राथमिक विस्तार अधिकारी रविंद्र ठोकळ, वेतन पथक सांगली अधिक्षक आबासाहेब लाड , वेतन निश्चिती सांगली लेखाधिकारी रविराज शिंदे,  वेतन पथक प्राथमिक सांगली अधिक्षक रियाज शेख,  माध्यमिक  सांगली अधिक्षक नरेंद्र माळी आदी अधिकारी उपस्थित होते.
मुख्याध्यापक संघाचे
  चेअरमन राहूल पवार यांनी प्रास्ताविक केले.सभेस व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड , शिक्षक नेते दादासाहेब लाड, संस्थाचालक संघ अध्यक्ष शारंगधर देशमुख, सचिव आर. वाय. पाटील, बाळासाहेब डेळेकर, बी जी बोराडे, डी एस घुगरे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे,दत्ता पाटील, सी. एम. गायकवाड, बाबा पाटील, सुरेश संकपाळ, राजेंद्र कोरे, उदय पाटील, मिलींद पांगिरेकर, के. के. पाटील, विजय मेटकर, रविंद्र मोरे, के. बी.वाघमोडे,अकबर पन्हाळकर, विलास पोवार, संतोष आयरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes