Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारीसरोज पाटील यांना रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार, २५ डिसेंबरला गडहिंग्लज येथे वितरणराष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीशिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी !अक्षय जहागिरदारला राष्ट्रपती सुवर्णपदक, आर्या देसाईला कुलपती सुवर्णपदक ! !महायुती करणार इलेक्टिव्ह मेरीट उमेदवारांची चाचपणी, उपसमितीची स्थापनाआत्मनिर्भर भारत अंतर्गत फाऊंड्री क्षेत्राला उत्पादनवाढीसह नव्या बाजारपेठांची संधी-प्रदीप पेशकरएसटीच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर विभागाने पटकावले विजेतेपद, जळगावच्या संघाला उपविजेतेपदसतेज पाटील म्हणजे निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणारे बादशहा : राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल जिपच्या चार अधिकाऱ्यांवर महापालिका निवडणुकीची जबाबदारीभाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांना खासदार महाडिकांच्या शुभेच्छा

जाहिरात

 

आपकडून ईडीची प्रतिकात्मक होळी

schedule24 Mar 24 person by visibility 703 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी, कोल्हापूरतर्फे ईडीची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. "ईडी-ईडी लावा काडी" अशा घोषणा देत होळी पेटवण्यात आली. ईडीच्या नावाने शिमगा करत आंदोलन करण्यात आल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक केली आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यामातून भाजपने केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी केलेले हे षडयंत्र असून यासाठी ईडीचा गैरवापर केला जात असल्याचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना सह-संपर्क प्रमुख विजय देवणे, अतुल दिघे, आप उपाध्यक्ष सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, अमरसिंह दळवी, डॉ. कुमाजी पाटील, स्मिता चौगुले, मयुर भोसले, डॉ. उषा पाटील, उमेश वडर, शशांक लोखंडे, आनंदा चौगुले, राजेश खांडके, इस्थेर कांबळे, स्वप्नील काळे, विवेक भालेराव, राकेश गायकवाड, सफवान काझी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes