Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आयुक्तांनी केली रस्ते कामाची पाहणी, अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सक्त सूचनापूरग्रस्तांना मदत, विवेकानंद कॉलेजचा पुण्यात सन्मान ! उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून गौरव!!रिंगरोडला महापालिकेतर्फे हॉस्पिटल, झूम प्रकल्प येथे सीएनजी गॅस प्रकल्प ! अमल महाडिकांची अधिकाऱ्यांसोबत चर्चाजिल्ह्यात तीस हजाराहून अधिक घरकुलांचे काम सुरू ! डिसेंबर अखेर ५० हजार घरकुलासाठी मोहिम ! !आठ महिने उलटले, सिनेट सभा नाही ! नियमांचे उल्लंघन,  प्रशासनाची चालढकल ! !कागलमध्ये राजकीय घमासान, मंडलिक-मुश्रीफांत हल्लाबोलमेन राजारामच्या विजयी खेळाडूंची वाजतगाजत मिरवणूक ! स्वागताला अधिकारी !!महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्कात जागा मंजूर, पाच एकर जागा उपलब्धवारसा हा दगड विटांचा समूह नसून अस्मितेचे प्रतीक - नंदिता घाटगेकागलात नवे राजकारण,  मंडलिकांना आबिटकरांची ताकत ! मुश्रीफ-समरजितराजेंच्या आघाडीला आव्हान ! !

जाहिरात

 

कोल्हापुरात रंगणार फुले - शाहू - आंबेडकरी जलसा, तीन दिवस कार्यक्रम

schedule04 Feb 25 person by visibility 656 categoryसामाजिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे पाच ते  सात फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फुले - शाहू - आंबेडकरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गायन समाज देवल क्लबमधील  गोविंदराव टेंबे सभागृहात हा महोत्सव होत आहे. 

पारंपरिक संस्कृतीची ओळख व थोर महापुरुषांचे प्रबोधनात्मक विचार नवीन पिढीपर्यंत पोहचावेत  या उद्देशाने सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनत्मक विचाराचा जागर असणारा फुले शाहू आंबेडकरी जलसा  आयोजित करण्यात येत आहे. पाच फेब्रुवारीला शाहीर आझाद नायकवडी, नागसेन सावदेकर,  वैभवी कदम, गणेश चंदनशिवे व सहकालाकार  यांचे प्रबोधनपर गीतगायन सादर होईल.सहा फेब्रुवारीला शाहीर हेमंतराजे मावळे,प्रवीण डोणे, रागिणी बोदडे, रामलिंग जाधव व सहकलाकर यांचे सादरीकरण होईल.सात फेब्रुवारी रोजी शाहीर राजा कांबळे, अभिजित कोसंबी, प्रसेंजित कोसंबी व सहकलाकार आपले सादरीकरण करतील

कोल्हापुरात होणाऱ्या या फुले-शाहू-आंबेडकरी जलसामध्ये सहभागी कलाकाराचा किंबहुना या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या कलापथकाचा, शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी   आस्वाद घ्यावा असे आवाहन  सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे यांनी केले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes