गोकुळमध्ये राष्ट्रीय दुग्धदिन साजरा, वर्गीस कुरियन यांना अभिवादन
schedule26 Nov 24 person by visibility 59 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय दुग्ध दिन व दुग्धक्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच २६/११ च्या मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यातील शहिदांना गोकुळ परिवाराकडून आदरांजली वाहण्यात आली.
संचालक प्रकाश पाटील म्हणाले, श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांची आज १०३ वी जयंती आहे. २०१४ पासून हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. गोकुळच्या जडणघडणीमध्ये डॉ. कुरियन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या विचारानेच गोकुळची वाटचाल चालू आहे. गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिलेली आहे.’
यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, अरविंद जोशी, रामकृष्ण पाटील, जगदीश पाटील, ए.एस.स्वामी, कैलास मोळक, एस.जी.अंगज, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. प्रकाश साळुंके, दत्तात्रय वागरे, डॉ.प्रकाश दळवी, संग्राम मगदूम, एम.पी.पाटील, डॉ.कडवेकर उपस्थित होते.