नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाई देवीची गजेंद्र लक्ष्मी रुपात पूजा
schedule04 Oct 24 person by visibility 230 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अश्विन शुक्ल द्वितिया शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, करवीर निवासिनी अंबाबाई देवीची गजेंद्र लक्ष्मी रुपात पूजा साकारली आहे. शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांग ा लागल्या होत्या.
देव आणि असूर यांच्यातील समु्द्रमंथनातून निघालेल्या रत्नांबरोबरच देवी लक्ष्मी प्रगट झाली. कमलासनस्था अशी लक्ष्मी प्रकट झाल्याबरोबर आठ दिशा तोलून धरणाऱ्या आठ हत्तींनी म्हणजे दिग्गजांनी तिच्यावर अभिषेक केला. देवीचे हेच स्वरूप गजेंद्र लक्ष्मी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात अनेक गावात गजेंद्र लक्ष्मीचे मंदिर आहे. दक्षिण महाराष्ट्र व कोकणात तिला भावकाई म्हणून सुद्धा ओळखले जाते. भावकाई भावेश्वरी या नावाने ओळखली जाणारी गजलक्ष्मी असे पूजेचे स्वरुप आहे.