महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
केआयटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग (ऑटोनॉमस) कोल्हापूर, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी "अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिविल इंजिनीरिंग" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेमध्ये स्थापत्य विभागाच्या २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत "फेरोसिमेंट सोसायटी ऑफ इंडिया (पुणे)", या संस्थेच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना फेरोसिमेंटची माहिती, निर्मिती व बांधकामातील वापराचे विविध पर्याय या विषयांवर माहिती देण्यात आली. आणि त्याचबरोबर फेरोसिमेंटचा वापर करून प्रात्यक्षिके देण्यात आली. याचबरोबर स्थापत्य विभाग व फेरोसिमेंट सोसायटी ऑफ इंडिया पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला. या कार्यशाळेला फेरोसिमेंट सोसायटी ऑफ इंडिया, पुणेचे पी. पी. लेले, एन एस जाधव, चंद्रमोहन हंगेकर, गिरीश सांगळे उपस्थित होते.
कार्यशाळेचे मुख्य समन्वयक प्रा. स्वप्निल मोहिते व प्रा. संदीप सावंत होते. स्थापत्य विभाग प्रमुख डॉ.आदित्य खेबुडकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी आणि रजिस्ट्रार डॉ. मनोज मुजुमदार यांचे कार्यशाळेसाठी सहकार्य मिळाले.