विवेकानंद कॉलेजमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा
schedule10 Jul 24 person by visibility 392 categoryशैक्षणिक

महाराष्ट् न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये आयक्यूएसी आण्ि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी “नॅकला सामोरे जाताना” या विषयावर कार्यशाळा झाली. गणित विभागप्रमुख प्रा.एस.पी.थोरात हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते.
शिवाजी विद्यापीठ, सॉफ्ट स्कील ट्रेनर डॉ.वैशाली शिंदे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे संवाद साधताना शाब्दीक, अशाब्दीक, हावभावातून, आपल्या नजरेतून तसेच बोलण्याच्या सूरातून आपण व्यक्त होत असतो. कोणता प्रसंग आहे आपण कसे व्यक्त झालो पाहिजे याबद्दल अतिशय मार्गदर्शन केले. संस्थेमध्ये वावरत असताना त्याठिकाणी असलेली सर्व आचारसंहिता पाळली पाहिजे. यामध्ये आपला ड्रेसकोड, ओळखपत्र, शिस्त यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो हे पटवून दिले.
कॉलेजमधील आयक्यूएसी विभागाच्या समन्वयक डॉ.श्रृती जोशी यांनी महाविद्यालयातील प्रशासकीय वर्ग हा देखील एक महत्वाचा अविभाज्य घटक असल्याचे नमूद केले. प्रशासकीय सेवकांसाठी महाविद्यालय विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. महाविद्यालय चौथ्यांदा नॅकला सामोरे त्या अनुषंगाने तयारीसाठी या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. प्रा.एस.पी.थोरात म्हणाले, कॉलेज हे एक कुटूंब समजून काम करा. कोणत्याही कामाचा तणाव न घेता जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वागा. महाविद्यालयाच्या विकासात प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे.’
इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ.कविता तिवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.कॉलेजचे रजिस्ट्रार आर.बी.जोग यांनी आभार मानले. यावेळी सहाय्यक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे, अधीक्षक एस के धनवडे, प्रा माधुरी पवार, प्रा. कोमल व्होनखंडे उपस्थित होते. प्रा सुप्रिया पाटील यानी सूत्रसंचालन केले.