कोल्हापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही -राजेश क्षीरसागर
schedule24 Sep 24 person by visibility 250 categoryमहानगरपालिका
*महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरास कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होत आहे. शहरातील बरेचशे प्रश्न मार्गी लागले आहेत. आगामी काळातही शहरातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही’अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर महानगरपालिका प्र.क्र.४४ मंगेशकर नगर अंतर्गत साठमारी परिसरातील भैरवनाथ चौक ते गोखले कॉलेज पर्यंत ड्रेनेज लाईन करणे या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आनंदराव पायमल ,चंद्रकांत देसाई, राजाराम मेथे,राजाराम चौगुले ,किशोर टिपुगडे ,एकनाथ टिपूगडे विलास मेथै,राजेंद्र पोवार कृष्णत बोडके, दिलीप जाधव ,संजय पायमल यावेळी विविध विकास कामांचे शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या अध्यक्ष शिवाजी पोवार यांच्या हस्ते क्षीरसागर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख शेखर चौगुले, सचिन पाटील, कुणाल शिंदे, विश्वनाथ माळकर, अश्विन शेळके, गणेश रांगणेकर,राहुल चव्हाण, श्रीकांत मंडलिक, क्रांतीकुमार पाटील आदी उपस्थित होते. किरण अतिग्रे यांनी स्वागत केले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजीत मंडलिक यांनी आभार मानले.