Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानअनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावाशिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार!  शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळाआदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणार

जाहिरात

 

खासदारकीच्या कालावधीत संभाजीराजे अतिक्रमणाविषयी गप्प का ?

schedule10 Jul 24 person by visibility 981 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : युवराज संभाजीराजे छत्रपती  हे सहा वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते तेव्हा त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी कधीही आवाज उठवला नाही. ते रागयड प्राधिकारणाचे अध्यक्ष होते तेव्हाही या अतिक्रमणाविषयी त्यांनी कधी आवाज उठवला नाही. ७ जुलैला जेव्हा सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाळगड येथे महाआरती करण्यात आली तेव्हा छत्रपती संभाजीराजे हे सहभागी झाले नाहीत. १४ जुलैला आता ते स्वतंत्र आंदोलन का करत आहेत ? हा प्रश्‍न सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असतांना विशाळगड अतिक्रमणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदू समाजाची दिशाभूल करू नये, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केले. 
 सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू एकता कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.  पाटील म्हणाले, ‘सात जुलैला विशाळगडावर सकल हिंदू समाजाची महाआरती झालेली असतांना परत एकदा १४ जुलैला हिंदू समाजाला विशाळगडावर बोलावून संभाजीराजे हिंदू समाजात दुफळी माजवत आहेत का ? या संदर्भात प्रत्यक्षात जर काही करायचे असेल, तर संभाजीराजे याविषयी हायकोर्टात चांगला अधिवक्ता का देत नाहीत ? जेव्हा संभाजीराजेंकडे अधिकार होते तेव्हा काहीच करायचे नाही आणि आता विशाळगडावर जाण्यासाठी आवाहन करायचे, हा नेमका काय प्रकार आहे ? यातून गडावर कोणता अनुचित प्रकार घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? त्यामुळे हिंदू समाजानेही कोणत्याही प्रकारे आततायीपणे कृती न करता शांतपणे या लढ्यात सकल हिंदू समाजासोबत उभे रहावे. शिवाय  ज्यांच्यामुळे हे अतिक्रमण झाले त्या अधिकार्‍यांवर कारवाई होणे अपेक्षित असून त्यांच्याकडून हा व्यय वसूल केला पाहिजे. ’
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष  गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष  संदीप सासणे, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निरंजन शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक  सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह  आशिष लोखंडे, हिंदू महासेभेचे जिल्हाध्यक्ष  मनोहर सोरप, प्रमोद सावंत, अभिजित पाटील, राजू तोरस्कर, योगेश केरकर, सोहम कुराडे, सनी पेणकर, आनंद कवडे, विकी भोगम, केदार मुनीश्‍वर, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes