कुलगुरु-प्रकुलगुरुंनी केले गाभ सिनेमाचे कौतुक, प्रयोदी संस्थेकडून विशेष शो
schedule26 Jun 24 person by visibility 313 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “निखळ मनोरंजन, वास्तववादी, संवेदनशीलता आणि आपल्या कामाची निष्ठा दर्शविणारं आगळंवेगळं मिश्रण म्हणजे गाभ हा सिनेमा आहे. दिग्दर्शक अनुप जत्राटकर, निर्माते मंगेश गोटुरे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक या वेगळया धाटणीच्या कलाकृतीची निर्मिती केली आहे.” अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी शुभेच्छा व्यक्त् केलय.
टाइम प्लस प्रॉडक्शन व एजे मल्टिमिडिया प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरसह जिल्ह्यातील विविध थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. प्रयोज्ञी फाऊंडेशनच्या अध्यक्षा योगिता कोडोलीकर व डॉ. प्रविण कोडोलीकर यांच्या पुढाकारातून, मंगळवारी (२५ जून) आयनॉक्स येथे विशेष शोचे आयोजन केले होते. समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, गाभ सिनेमाच्या टीमचे कौतुक केले. निर्माते मंगेश गोटुरे, दिग्दर्शक अनुप जत्राटकर, कलाकार विकास पाटील, उमेश बोळके, चंद्रशेखर जनवाडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये हा शो झाला. कोल्हापूर परिसरात हा सिनेमा तयार केला आहे. बहुतांश कलाकार, तंत्रज्ञ कोल्हापूरचे आहेत.
माजला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकांमध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगडया मातीतला हा सिनेमा आहे. या चित्रपटात दादू (कैलास वाघमारे )आणि फुलवा (सायली बानकर) या दोघांच्या प्रेमामध्ये रेडा कशी महत्वपूर्ण भूमिका बजावतो याची अतिशय रंजक पद्धतीने मांडणी केली आहे.
या शोप्रसंगी कुलगुरू व मान्यवरांच्या हस्ते गाभच्या टीमचा सत्कार झाला. प्र-कुलगुरू पी. एस. पाटील म्हणाले, ‘‘ ग्रामीण व सामाजिक गोष्टीभोवती सिनेमा गुंफला आहे. सर्व कलाकारांनी मन लावून काम केले आहे. शेवटचे अर्धा ते पाऊण तास तर अतिशय उत्कंठावर्धक आहे. सिनेमाची उत्तम घडी बसविले. सर्वांना हा सिनेमा भावेल. सामाजिक विषय खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे.”
कुलसचिव व्ही. एन. शिंदे म्हणाले, ‘ वेगळया धाटणीचा हा सिनेमा. आहे. सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे, सर्वच वयोगटातील लोकांना हा सिनेमा मनमुराद आनंद देतो. हसवत-हसवत हा सिनेमा प्रेक्षकांना अंतर्मुख बनवितो. प्रत्येकाने हा सिनेमा आवर्जून पाहावा.” प्रयोज्ञी फाऊंडेशनच्या अध्यक्षा योगिता कोडोलीकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डी. आर. मोरे, प्राचार्य व्ही. एम. पाटील, प्राचार्य आर. आर. कुंभार, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक अजयसिंह जाधव, विभागीय शिक्षण सहसंचालक अशोक उबाळे, प्राचार्य सरदार जाधव, प्राधिकरण अधिकारी संजय चव्हाण, शिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिव विलास सोयम, प्रा. डॉ. डी. के. गायकवाड, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, कास्ट्राइब कल्याण कर्मचारी महासंघाचे आनंद खामकर, अॅड. मंदार पाटील, अभिजीत राऊत, मनजित माने, अजिंक्य शिंदे, ऋतुराज माने आदी उपस्थित होते.