Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ढ जजडीवाय पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक ठरले यंग असोसिएट-फेलोविवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभमुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाहीदोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून  सत्कारराजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसएसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबितमहिला आयोग आपल्या दारी, अध्यक्षांनी केले प्रशासनाचे कौतुकएक जानेवारीपासून सातारा-कोल्हापूर डेमू धावणार नव्या वेळेनुसार

जाहिरात

 

नगररचना विभागाचा ढिम्म कारभार अन् नागरिकांचा तक्रारीचा पाढा ! महिलांना अश्रू अनावर

schedule26 Sep 24 person by visibility 240 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महापालिकेच्या नगररचना विभागाचा कारभार हा नेहमीच चर्चेचा ठरला. या विभागाच्या ढिम्म कारभाराचा अनेकांना फटका बसलेला. कोल्हापूर नेक्स्ट या संस्थेतर्फे गुरुवारी, आयोजित बैठकीत नागरिकांनी विविध प्रश्नावरुन या  विभागासंबंधी तक्रारींचा पाढा वाचला. तर सातत्याने पाठपुरावा करुनही प्रश्नांची सोेडवणूक न झाल्यामुळे त्रस्त बनलेल्या महिलांना बैठकीतच अश्रू अनावर झाले.
 नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध विषयासंबंधी या बैठकीचे आयोजन केले होते. नगररचना विभागाचे सहायक संचालक विकास झगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. या बैठकीला  या बैठकीत नगररचना विभागाचे रमेश मस्कर, एन.एस.पाटील, अरुण गवळी, चेतन आरमाळ, प्रमोद बराले आदींची उपस्थिती होती.  कोल्हापूर नेक्स्टचे निमंत्रक  चंद्रकांत चव्हाण यांनी शहरातील पायाभूत सोयी सुविधांबाबत महानगरपालिकेची नेमकी काय भूमिका आहे असा प्रश्न विचारला. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी,  अधिकाऱ्यांची मनमानी, विनापरवाना आणि नियमबाह्य बांधकामांमध्ये कनिष्ठ अभियंत्यांचे दुर्लक्ष, वर्षानुवर्षे महानगरपालिकेचे नाव न चढलेल्या ओपन स्पेस, फाईल गायब होण्याचा प्रकार आणि शहराचा होऊ घातलेला विकास आराखडा याबाबत भूमिका मांडली. 
प्रदीप उलपे यांनी बावड्यात गटर ओलांडून त्याच्यापुढे रस्त्यात बांधलेल्या घराबद्दल माहिती दिली. तानाजी जाधव, अनिल पोवार, शेफाली मेहता, सुरज धनवडे, प्रा. नीलिमा व्हटकर, राजर्षी शाहू स्पोर्ट्स अकॅडमीच्या गणेश सांगडे, संदीप पाटील  यांनी विविध भागातील अतिक्रमणाबाबत नगररचना खात्याने कशा चुका केल्या याची माहिती दिली.अभिजीत कुलकर्णी यांनी शाहू नाका ते राजेंद्रनगरकडे येणाऱ्या रस्त्यावरील ओपन स्पेस वरील अतिक्रमणांचा मुद्दा मांडला. मालती शिंदे या वृद्ध महिलेने, त्यांच्या मालकीच्या जागेत शेजार्‍याने केलेल्या अतिक्रमणाविरोधात नगररचना खात्यात २००८ पासून हेलपाटा मारत आहे. मात्र न्याय मिळाला नाही असे सांगताना भावनावश झाल्या. बैठकीला  गजानन तोडकर ,संतोष जोशी, उदय पाटील, सूर्यकांत शेणवी, अरुण कांबळे, बी.टी. वाघमारे, प्रभाकर कुलकर्णी, वि.म.गुळवणी, गणपत गायकवाड, रणजीत देसाई, रणजीत पाटील, फिरोज शेख उपस्थित होते. 
............
“ नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार शहरातील सर्व ओपन स्पेस चे जाहीर प्रकटन करू. त्या ओपन स्पेस ताब्यात घेणे आणि त्याला महानगरपालिकेचे नाव लावणे यासाठी तातडीने कार्यवाही करू.’’
-विकास झगडे, सहायक संचालक नगररचना विभाग

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes