कैलासगडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव यांचे निधन
schedule25 Jun 25 person by visibility 51 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंगळवार पेठेतील प्रसिद्ध कैलासगडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव (वय ९५ वर्षे) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी ( २६ जून २०२५ ) सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे. माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. बबेराव जाधव हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान व जुने कार्यकर्ते होते. ते केवळ राजकीयच नव्हे तर धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय योगदान देणारे व्यक्तिमत्व आहे. कोल्हापूरचे माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव यांच्या पश्चात कैलासगडची स्वारी मंदिराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे स्वीकारली आणि नवनिर्माणाच्या दिशेने मंदिराच्या विकासाची वाटचाल भक्कम केली. त्यांच्या कार्यकाळात मंदिराच्या जडणघडणीचे सोनेरी पर्व पाहायला मिळाले. स्थापत्यविषयक कामांपासून ते भाविकांच्या सोयीसुविधांपर्यंत अनेक उपक्रम राबवले गेले. त्यांच्या निधनाने कैलासगडची स्वारी मंदिराच्या विकासाच्या वाटचालीतील आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.