Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभातात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या बी फार्म अभ्यासक्रमास अ मानांकनहुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आठ ऑगस्टला क्रांतिज्योत मिरवणूक डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकरभारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाहीक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शितहॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे " संतांचे संगती " निरुपणास प्रारंभ 

जाहिरात

 

तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या बी फार्म अभ्यासक्रमास अ मानांकन

schedule06 Aug 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :  तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगरच्या बी. फार्म अभ्यासक्रमास क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांच्या रँकिंग अँड रेटिंग ऑफ कॉलेजेस या प्रक्रियेत 'अ' मानांकन पाच वर्षांसाठी प्राप्त झाले आहे. महाविद्यालयामध्ये बी. फार्मसीबरोबरच एम. फार्मसी, फार्म. डी., व डी. फार्मसी हेही अभ्यासक्रम उत्कृष्टपणे राबवले जातात. या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन, आधुनिक पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख उपक्रम आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता संवर्धन या निकषांवर महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत हे मानांकन मिळविले आहे. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष,  आमदार विनय कोरे यांनी गुणवत्ता मानांकन प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या डॉ. कल्पना एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत डॉ. अमोल शेरीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच क्यू.सी.आय. समन्वयक डॉ. पोपट एस. कुंभार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रविण पाटील, डॉ. विनय बागल, पंडित नलवडे,  सचिन कट्टीमन्नी आदींचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

 

…………………………………………

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes