Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अंबाबाई देवीच्या मूर्तीवर दोन दिवस संवर्धन प्रक्रिया ! भाविकांना ११-१२ ऑगस्टला मूळ मूर्तीचे दर्शन नाही !!जज बबगोकुळच्या रक्षाबंधन परंपरेतून जपला वीस २० वर्षांचा ऋणानुबंध भाजप करणार महापालिकेसाठी ४५ जागावर दावा, काँग्रेसने जिंकलेल्या जागेवर लक्ष !आदिवासी एम्पलॉइज फेडरेशनतर्फे रविवारी आदिवासी दिनाचे आयोजनतिरंगा झळकतोय आमच्या शेतात-शक्तीपीठ नको आमच्या वावरात ! पंधरा ऑगस्टदिनी शक्तीपीठ विरोधात आंदोलनयुवाशक्ती दहीहंडीचा थरार २४ ऑगस्टला रंगणार, प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस  28 ऑक्टोबरपासून कोल्हापूर -मुंबई नियमित विमानसेवा ! सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे दोन महिन्यात मुंबईपर्यंत धावेलगार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे सहा संस्थांना बीज राखीचे प्रशिक्षण स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाहिला अवकारिका सिनेमा

जाहिरात

 

वनतारा नमले, महादेवी हत्तीणला परत करणार ! कोर्टातही संयुक्तपणे पुनर्विचार याचिका !

schedule06 Aug 25 person by visibility 244 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नांदणी मठातील महादेवी हत्तीणला गुजरात येथे हलविण्यावरुन निर्माण झालेला जनतेच्या असंतोषापुढे वनतारा व्यवस्थापनने नमते घ्यावे लागले. महादेवी हत्तीणला परत कोल्हापुरात आणण्यासंबंधी नांदणी मठ, राज्य सरकार व वनतारा व्यवस्थापन यांनी संयुक्तपणे सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. सगळया प्रकिया पूर्ण करुन लवकरात लवकर महादेवी हत्तीणला नांदणी मठाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान करानी यांनी कोल्हापुरात सांगितले.

महादेवी हत्तीणला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी जनमताचा रेटा वाढत आहे. जनभावनांची दखल घेत वनताराचे सीईओ विहान हे बुधवारी(सहा ऑगस्ट २०२५) पुन्हा कोल्हापूरकडे धाव घेतली. येथील दिगंबर जैन बोर्डिंग येथे संयुक्त बैठक झाली. नांदणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामी, कोल्हापुरातील मठाचे भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेन महास्वामी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, सावकार मादनाईक, कृष्णराज महाडिक, संजय पाटील यड्रावकर व वनताराचे सीईओ विहान यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत महादेव हत्तीणला परत आणण्यासंबंधीच्या प्रक्रियेसंबंधी चर्चा झाली.

 या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सीईओ विहान म्हणाले, ‘महादेवी हत्तीणवरुन कोणाच्याही भावना दुखावण्याचा वनताराचा हेतू नव्हता.  अनंत अंबानी यांनी सांगितले आहे की कोल्हापूरकरांच्या भावना दुखावयाच्या नाहीत. महादेवी हत्तीण लवकरात लवकर नांदणी मठामध्ये परत कशी आणता येईल यादृष्टीने आता काम सुरू आहे. त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून नांदणी मठ, राज्य सरकार व वनतारा व्यवस्थापन यांनी संयुक्तपणे सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. यामध्ये कोणाचीही हार नाही, कोणाचा विजय नाही.  हा हत्तीचा विजय आहे. लवकरच महादेवी हत्तीण नांदणी मठात येईल.’

 नांदणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामी यांनी, महादेवी हत्तीणला पुन्हा आणण्यासंबंधी आता संयुक्तरित्या प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरले आहे. यासाठी कोर्टात संयुक्तपणे याचिका दाखल करण्यात येणार आहे. बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. महादेवी हत्तीणची मालकी नांदणी मठाकडेच असेल. दरम्यान हत्तीणच्या देखभालीसाठी नांदणी मठ परिसरात पालणपोषण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्या केंद्रात पालनपोषणसहित आवश्यकतेनुसार उपचार वनताराडून केले जातील.सांगितले. माजी खासदार राजू शेट्टी यांनी महादेवी हत्तीणला परत कोल्हापुरला आणण्याचा हा निर्णय म्हणजे जनमताचा विजय आहे. महादेवी हत्तीण परत येईपर्यंत आमचा लढा सुरू राहील. पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रक्रिया जलदगतीने होणार आहे. त्या अनुषंगाने सात ऑगस्ट रोजी मुंबईत वकिलांची बैठक होत आहे. अन्य मंदिर व मठातील हत्ती वनताराला नेण्याचा प्रकार घडल्यास कोल्हापूरसारखाच लढा उभारू.’

……………….

मुख्यमंत्र्यांच्यासोबत चर्चा

वनतारा व्यवस्थापनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत वनतारा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी, महादेवी हत्तीण सुखरुपपण नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जी याचिका दाखल करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला आहे. असे सांगितले. वनताराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आम्ही केवळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले. महादेवी हत्तीणचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. वन विभागाने नांदणी मठानजीक निवडलेल्या जागेवर महादेवी हत्तीणसाठी जे केंद्र उभारण्यता येणार आहे त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही वनताराने दर्शविली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes