Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ढ जजडीवाय पाटील विद्यापीठाचे तीन प्राध्यापक ठरले यंग असोसिएट-फेलोविवेकानंद कॉलेजमध्ये मंगळवारी शिष्यवृत्ती वितरण समारंभमुश्रीफ, आबिटकरांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक, अंबाबाई दर्शन  अन् विकासाची ग्वाहीदोन्ही मंत्र्यांची गोकुळचे चेअरमन डोंगळेंच्या घरी सदिच्छा भेट, कुटुंबियांकडून  सत्कारराजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसएसपींची कडक अॅक्शन, लाचप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह तिघे निलंबितमहिला आयोग आपल्या दारी, अध्यक्षांनी केले प्रशासनाचे कौतुकएक जानेवारीपासून सातारा-कोल्हापूर डेमू धावणार नव्या वेळेनुसार

जाहिरात

 

तळाशीकर गुरुजींचे निधन, संत साहित्याचा अभ्यासक हरपला

schedule29 Sep 24 person by visibility 226 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते व संत साहित्याचे अभ्यासक मारुतीराव भाऊसो जाधव यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी रविवारी (२९ सप्टेंबर २०२४) रोजी निधन झाले. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनासाठी त्यांनी ‘तुकारामबोवांच्या गाथेचे निरूपण’ (खंड एक आणि दोन) हा सुमारे १८०० पृष्ठांचा आणि ‘कान्होबाची गाथा’ हा सुमारे ४०० पृष्ठांचा ग्रंथ सिद्ध केला आहे. त्यांनी निरूपण केलेली तुकारामबोवांची गाथा अल्पावधीत लोकप्रिय ठरली. त्याची दुसरी आवृत्तीही विद्यापीठाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. मारुतीराव जाधव हे तळाशीकर गुरुजी म्हणून परिचित होते.
 नुकताच त्यांना, शिवाजी विद्यापीठातर्फे संत साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठाने ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ सुरू जाहीर झाला होता. विद्यापीठातर्फे नव्यानेच हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यंदाचा पहिलाच २०२४ या वर्षासाठीचा पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता.
मारुतीराव जाधव हे राधानगरी तालुक्यातील तळाशी येथील. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. तळाशीसारख्या दुर्गम भागात राहून संत साहित्याचा अभ्यास केला होता. ध्यासपूर्वक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या साहित्य अभ्यासल. तळाशी गावातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्याबरोबरच लोकजागृतीसाठी श्री ज्ञानेश्वरी व अध्यात्मावर ज्ञान देणारी ‘आनंदाश्रम’ संस्‍थेची स्थापना त्यांनी केली आहे. १९५६ पासून पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीचे ते संयोजन करीत आहेत. गावोगावी प्रवचनाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रबोधनाचे काम ते अखंडितपणे करीत आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
 त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. सोमवारी (३० सप्टेंबर )तळाशी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes