Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक ! पदाधिकारी -अधिकारी - शिक्षक संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक !!केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची  निवड !! जज डडसांगलीत शिक्षकांच्या आंदोलनाला प्रतिसाद, बहुसंख्य शाळा बंदकोल्हापूरात चार ऑगस्टला राज्यव्यापी परिषद, बाजार समितीच्या सेस विरोधात आंदोलनाची दिशा ठरणारचुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षकांचा हल्लाबोल, सरकार- प्रशासनाविरोधात उमटला रोषजिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहायकावर कारवाईची मागणीतीन महिन्यात तीन अध्यक्ष, गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीप मालगावेसंस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, चार शिक्षिकांसह लिपिकाविरोधात पोलिसात गुन्हाविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरे

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी सुरेश गोसावी

schedule10 Oct 25 person by visibility 3286 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे कुलगुरू डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी  नियुक्ती करण्यात आली. राजभवन कार्यालयाकडून शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला. यामुळे गेले तीन दिवस कुलगुरूविना असलेल्या शिवाजी विद्यापीठाला शुक्रवारी कुलगुरू लाभले . माजी कुरुगुरु डी.टी शिर्के यांचा 6 ऑक्टोबर 2025 रोजी कुलगुरूपदाचा  कार्यकाल संपला. त्यांच्यासह प्रकुलगुरू पी एस पाटील यांचाही कार्यकाल संपला. सोबत विद्यापीठातील चार  अधिष्ठाता यांना अधिष्ठाता पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू गोसावी हे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एमएससी, पीएचडी पदवी मिळवली आहे.  जून 2023 मध्ये त्यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरीपदी नियुक्ती झाली आहे .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes