चांदेकरवाडीमधील कुस्ती मैदानात सुभाष निऊगरे विजयी
schedule15 Sep 24 person by visibility 657 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे पोथी समाप्तीनिमित्त कुस्ती स्पर्धा झाली. या मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत सुभाष निऊगरे (मोतीबाग) या कुस्तीपटूने रेंदाळच्या विशाल पोवारवर अवघ्या दीड मिनिटात विजय मिळवला. क्रमांक दोनच्या कुस्तीत अक्षय खोत चांदेकरवाडी याने सांगरूळच्या शुभम खाडेवर विजय मिळवला. ततपूर्वी आखाडा पूजन खोतगावचे पाटील राजाराम धोडी यांच्या हस्ते झाले .
तसेच प्रथम क्रमांकाची कुस्ती राजाराम खोत, तानाजी खोत, आनंदा खोत, निवास खोत, दत्तात्रय पत्ताडे , रंगराव नलवडे, प्रकाश खोत, अशोक खोत, कृष्णात खोत, भाऊ खोत , संदिप खो , व पै कुलदीप खोत यांच्या उपस्थितीमध्ये कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले.
क्रमांक तीनची कुस्ती प्रकाश पाटील बेलवळे याने महेश पाटीलवर (अर्जुनवाडा) विजय मिळवला. अन्य विजयी पैलवान ओम पाटील तिटवे , हर्षवर्धन पाटील बेलवळे ,सतोष खोत , आदित्य खोत, वेदांत पाटील तसेच अन्य ५० वर चटकदार कुस्त्या झालेल्या आहेत ,
पंच म्हणून जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष प्रकाश खोत यांच्या मार्गदर्शनाखाली निवास खोत , कृष्णात खोत , संदिप खोत , भाऊ खोत , राजाराम खोत . दतात्रय पताडे , धोडीराम खोत यांनी काम पाहिले. पै कुलदीप खोत यांनी सूत्रसंचालन केले. बापूसो खोत यांनी निवेदन केले. पांडूरंग खोत यांनी आभार मानले.