Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला हिंदकेसरी, पुण्याचा पृथ्वीराज मोहोळला उपविजेतेपद

schedule18 May 26 person by visibility 399 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : क्रीडामहर्षी साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित ५२ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरचा मल्ल महेंद्र गायकवाड हा हिंदकेसरीचा मानकरी ठरला. या स्पर्धेत गायकवाडने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात केली. या स्पर्धेदरम्यान पृथ्वीराजला दुखापत झाली. त्याने माघार घेतल्यामुळे  महेंद्रला विजयी घोषित केले. राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्यावतीने आयोजित ही स्पर्धा सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात झाली. महेंद्र हा महाराष्ट्रातील दहावा तर देशभरातील मिळून ३९ वा हिंदकेसरी ठरला.

 हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या मानाच्या किताबासाठी दोन्ही मल्लांमध्ये अंतिम लढत असल्यामुळे साऱ्यांच्या नजरा याकडे लागल्या होत्या. यापूर्वी य दोन्ही मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली होती. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ भारी ठरला होता. तर महेंद्रला तीन वेळा महाराष्ट्र केसरीने हुलकावणी दिली होती. मात्र सातारा येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत महेंद्र हा बाहुबली ठरला. पृथ्वीराज व महेंद्र यांच्यातील लढत तुल्यबळ होती. कुस्तीला सुरुवात होताच महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला. या दोघांच्या लढती दरम्यान पृथ्वीराजच्या हाताला इजा झाली. परिणामी कुस्ती काही वेळ थांबवली. या  लढतीत महेंद्रला दोन गुण मिळाले.काही वेळानंतर कुस्ती पुन्हा सुरू झाली. मात्र पृथ्वीराजचा पिच्छा काही दुखापतीने सोडला नाही. दुखापतीमुळे पृथ्वीराजने लढतीतून माघार घेतली. महेंद्रला हिंदकेसरी घोषित करण्यात आले.

 दरम्यान महिला हिंद केसरी किताबासाठी हरियाणा येथील काजल धोजक व दिल्लीतील खुशी दलाल यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीत काजलने खुशीला चितपट करत हिंदकेसरी ठरली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes