शिवाजी विद्यापीठ नावासंबंधी शिवप्रेमींची शनिवारी बैठक
schedule21 Mar 25 person by visibility 244 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे यासाठी शिवप्रेमींची शनिवारी (२२ मार्च २०२५) बैठक होत आहे. सर्किट हाऊस येथे सकाळी ११.४५ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला शिवप्रेमी संघटना, इतिहास अभ्यासक, संशोधक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी संघटना, विद्यापीठातील कर्मचारी व राजकीय कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करावा अशी मागणी काहींनी केली आहे. दुसरीकडे विद्यापीठाच्या नामविस्ताराला शिवप्रेमींनी विरोध केला आहे. विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’हेच कायम राहावे अशी भूमिका शिवप्रेमींची आहे. यासंबंधी शनिवारच्या बैठकीत पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.