शिंदे-फडणवीस सरकार गद्दार अन् बेईमानांचे, हे घटनाबाह्य सरकार कोसळणारच : आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात हल्लाबोल
schedule01 Aug 22 person by visibility 1053 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : उठाव आणि बंड करायला हिम्मत लागते. शिवसेनेशी बेईमानी केलेले आमदार हे गद्दार आहेत. राज्यात स्थापन आलेले शिंदे-फडणवीस यांचे सरकार हे बेइमान आणीइ गद्दारांचे आहे. हे घटनाबाह्य सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असा घणाघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येेे आयोजितत केलेल्या शिवसंवाद यात्रेत ते बोलत होतेे. रात्री आठ वाजण्याच्याा सुमारास ठाकरे हे भाषण करायला उभे राहिले. यावेळी पावसाला सुरुवात झाली. ठाकरे यांनी भर पावसात भाषण चालू ठेवलेे. शिवाय व्यासपीठावरून खाली येत शिवसैनिकात मिसळून भाषणाला प्रारंभ केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या चाळीस आमदार व बारा खासदार यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले आमदार व खासदार हेे गद्दारच आहेत. त्यांच्यावरील गद्दारीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही. त्यांनी हिम्मत असेल तर आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा व निवडणुकींना सामोरे जावे असे खुले आव्हाने आदित्य ठाकरे यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना काही मंडळींनी फितुरीचे राजकारण केले. राक्षसी राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्तेची चटक त्यांमुळेच त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस आमदार व खासदारांना पक्षाने काय द्यायचे राहिले होते. आमदार केले खासदार केले , मंत्री पद दिली तरी राक्षसी महत्त्वाकांक्षाच्या लालसेने या मंडळींनी शिवसेना आणि शिवसैनिक यांच्याशी बेईमानाने वागले. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपसोबत सत्ता सरकार स्थापन केलेे. तेथे त्यांनी आनंदात राहावेे.शिवाय जर हिम्मत असेल तर त्यांनी आमदारकी आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांनी केवळ शिवसेना व शिवसैनिकाशी गद्दारी केली नाही तर माणुसकीशी गद्दारी केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. तुमचेही प्रेम कायम शिवसेना पक्षप्रमुखांच्या सोबत राहू दे. शिवसैनिक हेच खरे शिवसेनेचे ताकद आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी जिल्हाप्रमुुुख रवी चौगुले विनायक साळोखे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, सुशील भांदिग्रेेेेे, विजय सावंत, अनिल पाटील तमनजित माने, महिला आघाडीच्या स्मिता मांढरे प्रीती क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक नियाज खान हे कार्यकर्त्यांच्यााा समवेत वाजतगाजत ठाकरे यांच्या सभेत दाखल झाले.