Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर फर्स्टचा सामाजिक उपक्रम, पोलिस दलासाठी शंभर रेनकोटचे वाटपगोकुळतर्फे ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारकोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. संजय डिक्रूज, उपाध्यक्षपदी अॅड. नेताजी पाटील जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या ! मनिषा देसाई, अरुण जाधवांचा समावेश !!अभिषेक बोंद्रे, संताजी घोरपडे, प्रसाद जाधवांचा भाजपात प्रवेशदिलीप पोवार, उत्तम कोराणेसह 55 जण भाजपमध्ये, मुंबईत प्रवेशाचा धमाका ! मुश्रीफांना धक्का!गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रोहित बांदिवडेकर, उपाध्यक्षपदी सदानंद घाटगेबदलीस पात्र शिक्षकांना पर्याय निवडण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत अर्जाची मुदतऑक्टोबरमध्ये झेडपी, नोव्हेंबरमध्ये नगरपालिका ! डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुकीची शक्यता !!नगररचना कार्यालयात  जनसुनावणी ! ढिम्म अधिकारी, आंदोलकांकडून दगड पूजण्याचा प्रकार!!

जाहिरात

 

कोल्हापूर फर्स्टचा सामाजिक उपक्रम, पोलिस दलासाठी शंभर रेनकोटचे वाटप

schedule16 Jul 25 person by visibility 48 categoryउद्योग

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पावसाळ्याच्या कठीण काळात अखंड सेवा देणाऱ्या आपल्या पोलिस बांधवांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने, "कोल्हापूर फर्स्ट" च्या  मार्फत १०० रेनकोट पोलिस विभागास सुपूर्त करण्यात आले. पोलिस अधीक्षक कार्यालय येथे रेनकोट वितरणाचा कार्यक्रम झाला.

 कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते व अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस समाज कल्याण विभागाचे अधिकारी कांकडकी, शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप गायकवाड, सुनील जांभळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेन्द्र जैन यांनी,‘ समाजरक्षणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलिस दलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मानाचा छोटासा प्रयत्न आहे. समाजामध्ये डॉक्टर्स आणि पोलीस हे दोघे चोवीस तास कार्यरत असतात. कोल्हापूर फर्स्टच्या मार्फत या दोन्ही प्रोफेशन्स बद्दल लोकांच्या मनात आदराची, सन्मानची भावना निर्माण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.’ यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आपल्या शहरातील पोलीस दलाप्रती आपुलकी आणि सन्मान व्यक्त करण्याचा हा उपक्रम भविष्यातही विविध स्वरूपात राबवण्यात यावा अशी आशा व्यक्त केली. 

या कार्यक्रमास कोल्हापूर फर्स्टचे सहसमन्वयक सर्जेराव खोत, कमलाकांत कुलकर्णी , बाबासो कोंडेकर, मोहन कुशिरे, हरिश्चंद्र धोत्रे, डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. अमोल कोडोलीकर, प्रतापबापू कोंडेकर, उज्ज्वल नागेशकर, अजय कोराणे, बी व्ही वराडे, जयदीप पाटील, पदमसिंह पाटील, जयदीप बागी,संजय पेंडसे, विश्वजित देसाई, विजय चोपदार, विकास जगताप आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes