Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ कर्मचारी संघटनेकडून सुनिल वाडकरांच्या वक्तव्याचा निषेध; कडक कारवाईची मागणीकुलगुरु निवड लांबली, मुलाखती कधी होणार ? कुलपती कार्यालयाकडे लक्षजिल्हा परिषदेच्या सभेत विषय समित्यांवर सदस्यांच्या निवडीराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या - अभिजीत तायशेटेकोल्हापुरात बुधवारपासून मिलेटसह फळ महोत्सव कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळावीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरी

जाहिरात

 

जिल्हा परिषदेच्या सभेत विषय समित्यांवर सदस्यांच्या निवडी

schedule21 Apr 26 person by visibility 24 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांवर सदस्य निवडीसाठी अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, २० एप्रिल २०२६ रोजी सभा झाली.महत्वाच्या समित्यांवर निवड व्हावी म्हणून सदस्यांच्या हालचाली सुरू होत्या. सभेत या निवडी बिनविरोध झाल्या.

स्थायी समिती सदस्य म्हणून अमरसिंह पाटील, शिवाजी जाधव, अभिजीत तायशेटे, रेश्मा राहुल देसाई, सुधीर देसाई, संग्रामसिंह कुपेकर, जयंत पाटील, महेश पाटील यांच्या निवडी झाल्या. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीमध्ये अनिरुद्ध रेडेकर, अरुण जाधव, संग्राम पाटील, मानसी कल्लाप्पा भोगण, राजकुंवर रणवीरसिंह गायकवाड, सुयशा अंबरिशसिंह घाटगे या सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. कृषी समितीत प्रियांका तानाजी भोसले, मिलिंद कुरणे, विक्रमसिंह पाटील, राजेंद्र पाटील, विश्वनाथ पाटील, विलास नाईक, विक्रमसिंह पाटील, राजेंद्र पाटील, जयश्री गजानन गाडे, शोभा गणपती फराकटे, राजश्री लक्ष्मण गावडे आणि सुवर्णा शशिकांत पाटील यांना संधी मिळाली.

 समाजकल्याण समितीत अतीश शिंगे, राहुल आवळे, कुमार कांबळे, सुवर्णा रणजीत कांबळे, प्रचिता चंद्रकांत कोळी, शोभा युवराज बेलेकर, अर्चना कल्याण निकम, शोभा गणपती फराकटे, सलीम महात, नंदिनी संदीप कांबळे, रसिका अमृत पाटील यांना स्थान मिळाले.  शिक्षण व क्रीडा समितीत स्नेहल  केतन वेल्हाळ, उत्तरा  विजीत शिंदे, शुभांगी महेश कुंभार, सानिका राहुल आवाडे, रेखा प्रकाश मुगडे, भगवान पाटील, अमरसिंह चव्हाण, एकनाथ पाटील आहेत. बांधकाम समितीवर सर्जेराव पाटील पेरीडकर, राजेंद्र सुर्यवंशी, अमोल चव्हाण, इंद्रजीत पाटील, अमरसिंह पाटील, संभाजी पाटणकर, काकासाहेब सावडकर, शिरीष देसाई यांच्या निवडी झाल्या.

अर्थ समितीवर रवींद्र पाटील, एकनाथ पाटील, नामदेव वाईंगडे, अमृता अरुण डोंगळे, साताप्पा पाटील, शिवशंकर हत्तरकी, राजश्री लक्ष्मण गावडे आणि सागर धुंदरे हे सदस्य आहेत. महिला व बालकल्याण समिती सदस्य म्हणून वर्षाराणी अरुण पाटील, रोहिणी अर्जुन आबिटकर, संयोगिता रणधीर मोरे, प्रतिभा यशवंत चव्हाण, शैलजा सतीश पाटील, शिवानी विजयसिंह भोसले, विनिता सागर भोगम, सोनाली विलास पाटील यांच्या निवडी झाल्या. पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीवर प्रचिता चंद्रकांत कोळी, अरुण जाधव, छाया प्रकाश देसाई, अर्चना अमोल चौगुले, नामदेव वाईंगडे, रचना मष्णू गावडे, शैलजा सतीश पाटील, अश्विनी अनिल बिरंजे आहेत. आरोग्य समितीवर सर्जेराव पाटील पेरिडकर, वर्षा अविनाश सावडकर, सुदर्शन खोत, प्रशांत शहापुरे, क्रांतिसिंह पवार पाटील, पूजा दिलीप पाटील, रचना मष्णू गावडे, सोनाली राहूल सावंत यांना संधी मिळाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes