शिवाजी मार्केटमधील पाच गाळे इस्टेट विभागाकडून सील
schedule03 Jul 24 person by visibility 368 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा पाच गाळेधारकांचे गाळे महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले. महानगरपालिका मालकीच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्ड च्या विविध मार्केटमधील स२०१५-१९ व सन२०१९-२४ या वर्षातील भाडे दंड/व्याजामध्ये सवलत योजना राबवून भाडे भरून घेण्याची कार्यवाही चौदा जूनपर्यंत सुरू होती. या सवलत योजनेमध्ये १३९२ भाडे करार मुदत संपलेल्या गाळेधारकांपैकी ५०८ गाळेधारकांनी थकीत भाडे भरून दंड/व्याजावरील सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. परंतू ज्या गाळेधारकांनी सवलत योजनेमध्ये थकीत भाडे भरलेले नाही अशा गाळेधारकांचे गाळे सील करण्याची मोहिम राबविण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी मार्केट मधील पाच गाळे सील करण्यात आले.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व उपायुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, सहायक अधिक्षक मकरंद जोशी, कनिष्ठ लिपीक गिरीश नलवडे, कल्पना शिरदवाडे, आकाश शिंदे, विष्णू चित्रुक व सदानंद फाळके यांनी भाग घेतला.
यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे. थकबाकीदार गाळेधारकांनी आपली थकबाकी त्वरीत महापालिकेकडे भरून सहकार्य करावे व सील सारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन इस्टेट विभागाने केले आहे.