शाळा प्रवेशोत्सव होणार गोड ! अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे वेलकम !!
schedule13 Jun 24 person by visibility 4064 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नव्या शैक्षणिक वर्षारंभाला शनिवारी, पंधरा जूनपासून प्रारंभ होत आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत, प्रभातफेरी, पुस्तक वाटप असे विविध उपक्रम होणार आहेत. शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना गोड खाद्यपदार्थ दिला जाणार आहे. शिवाय जिल्हा परिषदेचे अधिकारी शाळा प्रवेशोत्सवदिनी शाळेत उपस्थित राहणार आहेत. अधिकाऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळा भेटीचा कार्यक्रम निश्चित केला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रवेशोत्सवसाठी अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीचे नियोजन केले आहे. यादिनी सीईओ कार्तिकेयन हे चंदगड तालुक्यातील विद्या मंदिर तडशिनहाळ येथे भेट देणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने हे कन्या विद्यामंदिर तारदाळ येथे, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक सुषमा देसाई या कुमार विद्यामदिर कुरुंदवाड येथे भेट देणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई या विद्या मंदिर नंदवाळ येथे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव हे विद्या मंदिर मौजे वडगाव येथे, मुख्य वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डेकर हे विद्यामंदिर पिंपळगाव खुर्दे येथे, जल जीवन मिशन विभागाच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट या जीवन शिक्षण विद्या मंदिर धरणगुत्ती येथे शाळा भेट करतील.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर हे विद्यामंदिर सुंडी येथे, महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील या विद्या मंदिर सावे येथे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड हे परशुराम विद्या मंदिर गगनबावडा येथे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर या विद्या मंदिर आणाजे येथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर हे विद्या मंदिर बशाचामोळा, समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार हे कन्या विद्या मंदिर पोर्ले, कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण हे विद्या मंदिर ऐनापूर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद बाबर हे विद्या मंदिर आनूर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वैजनाथ कराड हे विद्या मंदिर सरोळी येथे, शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे या विद्या मंदिर मठ गजापूर येथे शाळा भेट करणार आहेत.
…………………….
‘शाळा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात करण्याच्या सूचना आहेत. विद्यार्थ्यांचे गुलाब फूल देऊन स्वागत, पाठयपुस्तकांचे वाटप होणार आहे. नवीन प्रवेशासाठी गावपातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रभातफेरी काढण्यासंबंधी शाळांना सूचना केल्या आहेत.. कागल, हातकणंगले तालुक्यात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत होतील. अन्य तालुक्यताही पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्याचेही नियोजन आहे. ’
-मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग