Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करू यागवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे- प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर गोकुळच्या दुधाची विक्रमी विक्री, गुढीपाडवा-रमजान ईदला मिळून 43 लाख लिटरची विक्री जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेशअधिकाऱ्यांना शिवीगाळ- महापालिकेत शडडू, सभागृहाला न शोभणारी मर्दुमकी ! नगरसेवकांच्या कृत्यामुळे, नेत्यावर माफीची वेळ ! !नगरसेवकांना समज देणार, ऐकले नाहीत तर खासबागेत कुस्ती लावू - हसन मुश्रीफसीईओचे जिल्हाधिकारीपदाकडे लक्ष, कार्तिकेयन झेडपीत किती दिवस काम करणार कोण जाणे ? लोहिया हायस्कूलमध्ये ग्रंथामधून उभारली ज्ञानाची गुढीवालावलकर हायस्कूलमध्ये गुढी ज्ञानाचीगुढी पाडव्यानिमित्त भवानी मंडपाला २५ फुटी साखरेची माळ

जाहिरात

 

गोकुळच्या दुधाची विक्रमी विक्री, गुढीपाडवा-रमजान ईदला मिळून 43 लाख लिटरची विक्री

schedule21 Mar 26 person by visibility 113 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : रमजान ईद व गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या विक्रीत यंदा उल्लेखनीय वाढ झाल. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेऊन संकलन व वितरणात प्रभावी नियोजन केले. रमजान ईद दिवशी २५ लाख ४५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली असून हा गोकुळच्या इतिहासातील एक दिवसाचा उच्चांक ठरला आहे.

          तसेच गुरुवारी साजऱ्या झालेल्या गुढीपाडव्यानिमित्य १८ लाख लिटर्स दूध विक्री झाली असून श्रीखंड व बासुंदी या सारख्या दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीत उच्चांकी वाढ झाली आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संघाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने  मंत्री हसन मुश्रीफ व गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. रमजान ईद दिनानिमित्य गोकुळ परिवाराच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ आहे. सणासुदीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर दुधाचा सुरळीत पुरवठा करणे ही उल्लेखनीय बाब आहे.  गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “रमजान आणि गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर गोकुळ परिवाराने एकजुटीने काम केले. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला सातत्यपूर्ण व दर्जेदार पुरवठा, तसेच अधिकारी व कर्मचारी, वितरकांचे योग्य नियोजन यामुळेच ही विक्रमी विक्री शक्य झाली. यंदा रमजान ईद निमित्य २५ लाख ४५ हजार ०४७ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २३ लाख ६३ हजार १७० लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ८१ हजार ८७७ लिटर्सची वाढ झाली. तसेच झालेल्या गुढीपाडव्यादिवशी १८ लाख लिटर्स दूध विक्री तसेच श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली असून गोकुळने  सातत्याने प्रगतीचा आलेख उचावत नवीन मानदंड निर्माण केला आहे.

   नविद मुश्रीफ यांनी भविष्यात प्रतिदिन २७ लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्‍य करू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, कैलास मोळक, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes