खाजगी मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण लाभासाठी शिफारस !
schedule17 Jul 24 person by visibility 483 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :राज्यातील खाजगी प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांना बंद केलेले अर्जित रजा रोखीकरणाचे लाभ मिळण्यासाठी सकारात्मक शिफारस पाठवण्याचे आश्वासन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांडरे यांनी शिक्षक आम प्रा जयंत आसगांवक व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांना दिले.
याबाबतचे निवेदन राज्याध्यक्ष रसाळे यांनी शिक्षण आयुक्त मांडरे याना दिले . यावेळी शिक्षक सेनेचे समन्वय संतोष आयरे , मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार ,माजी सचिव दत्ता पाटील , मुख्याध्यापक संघ महामंडळाचे सदस्य एम . आर . पाटील ,शैक्षणिक व्यासपीठाचे सी .एम गायकवाड, पुणे शहर विभागाचे राहुल राठोड ,राजेंद्र आपुगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे लाभ मिळत होते . तथापि ३० मे २०२४ च्या परिपत्रकान्वये प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयांने ' असे लाभ देता येत नाहीत असे कळविले आहे . ही बाब खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्यावर अन्याय करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. याबाबतीत सकारात्मक अहवाल सरकारकडे पाठवून सहकार्य करू असे आश्वासन राज्याचे शिक्षण आयुक्त मांडरे यांनी दिले .अशाच पद्धतीचे सकारात्मक अहवाल पाठवण्याचे आशासन राज्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी अमोल पवार व सहसंचालक अरुण आत्तार व माध्यमिक प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांनी दिले .त्यामुळे राज्यातील खाजगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे लाभ पुन्हा मिळतील असा विश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे व्यक्त केला.