रत्न उद्योगने पटकावले स्मॅक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद
schedule02 Feb 25 person by visibility 183 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहतमधील कारखानदारीतील मालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्मॅक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद रत्न उद्योग संघाने पटकाविले. अंतिम सामन्यात यश टायसर्ग संघावर मात केली. दोन दिवस या स्पर्धा शास्त्रीनगर मैदानावर सुरू होत्या.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. स्मॅकचे चेअरमन राजू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ झाला. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरतर्फे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेंतर्गत एकूण १९ सामने झाले.एकूण बारा संघ सहभागी झाले होते.
अंतिम सामन्यात रत्न उद्योग संघाने आठ षटकात चार बाद ७३ धावा केला. त्यांच्या अक्षय पाटीलने १४ चेंडूत ने चवदा २० धावा केल्या. वैभव तासगावकरने ब्रारा चेंडूत पंधरा धावा केल्या. यश टायगर्सचे कर्णधार अनिल माळी, विनायक स्वामी व संदीप चेचर यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केले.
अंतिम सामन्यापूर्वी यश टायगर्स विरुद्ध झंवर ग्रुप चॅम्पियन्स यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात झंवर ग्रुप चॅम्पियन्सचा पाच धावांनी पराभव करत यश टायगर्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. यश टायगर्सच्या अनिल माळी ने दहा चेंडू पस्तीस धावा काढल्या. विनायक सावंत यांने दोन षटकात सात धावा देत दोन बळी घेतले.
रत्ना उद्योग विरुद्ध कोहिनूर मेटालिक्स यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला.रत्ना उद्योगने कोहिनूर मेटॅलिक्स वर सहा धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.रत्ना उद्योगच्या वैभव तासगावकर ने तेवीस चेंडूत चवतीस धावा केल्या व दोन षटकांत चोवीस धावा देत तीन बळी घेतले.
विजय फाउंड्री इक्विपमेंटचे विजय व नवनाथ पोवार तसेच मिस्टेर हेल्थ अँड हायजिन चे विनय ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मॅकचे ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सदस्य उद्योजक अभिषेक झंवर, साहिल मोमीन, ओंकार भगत, अभिषेक सोनी, श्रीराम सुरवसे, कुणाल कट्टी, प्रेम शिंदे, हर्षवर्धन राठोड यांनी या स्पर्धेचे आयोजन केले.
अंतिम सामन्यासाठी स्मॅकचे कुसाळे, खजानिस बदाम पाटील, संचालक नीरज झंवर, अतुल पाटील, रणजित जाधव, निमंत्रित सदस्य एम. वाय. पाटील, अजिंक्य तळेकर, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष स्वरूप कदम, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष अजय सप्रे, उद्योजक भीमराव खाडे, उदय साळोखे, आदित्य जाधव, सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनचे काका पाटील आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक [ टायटल स्पॉन्सर ] विजय फाउंड्री इक्विपमेंट, सह प्रायोजक [ गोल्ड स्पॉन्सर ] मिस्टेर हेल्थ अँड हायजिन, डग आऊट प्रायोजक डी. आर. एंटरप्राइजेस यांनी स्वीकारले होते.
या १२ संघाचा सहभाग -
यश टायगर्स [ यश मेटॅलिक्स प्रा. लि., ], सरोज वॉरियर्स [ सरोज ग्रुप ऑफ कंपनीज् ] , विश्वकर्मा वॉरियर्स [ विश्वकर्मा फौंडर्स (इं) प्रा. लि., ] , कॅस्प्रो स्पेअर पार्ट्स [ कॅस्प्रो ग्रुप ऑफ कंपनीज् ] , एस.बी.आर. चॅलेंजर्स [ एस. बी. रिशेलर्स ] , रत्ना उद्योग , झंवर ग्रुप चॅम्पियन्स [ झंवर ग्रुप ] , सवेरा इलेव्हन [ मयुरा ग्रुप ] , ट्रायो चॅलेंजर्स [ ट्रायो एंटरप्राइजेस ] , मिस्टेर मार्व्हल्स [ मिस्टेर हेल्थ अँड हायजिन ] , कोहिनूर मेटॅलिक्स व व्ही.पी. वॉरियर्स [ व्ही.पी. ग्रुप ].