कुस्ती अन् बैलगाडी शर्यतीवर आधारित रांगडा आजपासून प्रदर्शित
schedule12 Jul 24 person by visibility 512 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कुस्ती आणि बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख. दोन्हीही रांगडे खेळ. ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेले. या दोन्हीची सांगड घालत निर्माण झालेला रांगडा हा सिनेमा बारा जुलै २०२४ पासून थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
प्रदर्शनापूर्वीच सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेमकथा, राजकारणाच्या सोबतीला अॅक्शनचा धमाका या सिनेमात पाहावयास मिळणार आहे. हा सिनेमा नक्कीच लोकांना आवडेल असा विश्वास या सिनेमाच्या टीमने व्यक्त केला. या सिनेमात दोन राष्ट्रीय कुस्तीपटूंच्या प्रमुख भूमिका आहेत.या सिनेमात भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंक, भीमराज धनापुणे, आतिक मुजावर, संदीप रासकर, राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद यांच्या भूमिका आहेत. शेतकरी पुत्र प्रॉडक्शनची निर्मिती आहे. योगेश बालवडकर, किरण फाटे, राहुल गव्हाणे, मच्छिंद्र लंके, अब्बास मुजावर अणि आयुब हवालदार यांनी संयुक्तपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. कथा आणि दिग्दर्शकआयुब हवालदार यांनी केले आहे. दीपक ठुबे हे संवादलेखक आहेत.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार आणि तंत्रज्ञाची टीम नुकतीच कोल्हापूरला आली होती. याप्रसंगी त्यांनी सिनेमाचे वेगळेपण, कुस्ती आणि बैलगाडी शर्यतीचा छंद, त्यातून घडणारे कथानक याविषयी सांगत सिनेमाची उत्कंठा वाढविली आहे.