केआयटीच्या अभिग्यानमध्ये राजेंद्रसिंह, उज्ज्वल निकम, कौशक मराठे साधणार तरुणांईशी संवाद
schedule28 Nov 24 person by visibility 113 categoryशैक्षणिकक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयातर्फेे ‘अभिग्यान’ या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन रविवारी, एक डिसेंबर २०२४ रोजी होत आहे. हॉटेल सयाजी येथील बँक्वेट हॉल येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी पाच या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती अभिग्यान मुख्य समन्वयक प्रा.अमर टिकोळे यांनी दिली.
वॉक विथ द वर्ल्ड या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी व्यासपीठाच्यावतीने याचे नियोजन करण्यात येते. अभिग्यानचे यंदाचे बारावे वर्ष आहे. ‘अभिग्यान’ मध्ये यावर्षीही वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत यशस्वीपणे काम करणाऱ्या व खऱ्या अर्थाने तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना निमंत्रित करण्यात आले आहे.
भारतातील सुप्रसिद्ध पाणी व पर्यावरण संरक्षक राजेंद्र सिंग, जेष्ठ वकील उज्वल निकम, वस्त्रोद्योग क्षेत्रातील कॉटन किंग या नामांकित ब्रँडचे संचालक कौशिक मराठे, चित्रपट व नाट्य क्षेत्रातील लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन,टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकर हे यावर्षीचे पाहुणे असणार आहेत अशी माहिती संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी दिली.
अभिग्यान-२४ च्या नियोजनात संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले आहे. ८०० विद्यार्थ्यांचा व प्रोफेशनलचा सहभाग या कार्यक्रमासाठी निश्चित झाला असून पुढील एक-दोन दिवसात १००० चा टप्पा पूर्ण होईल अशी आयोजकांना खात्री आहे. अशी माहिती अधिष्ठाता,विद्यार्थी उपक्रम डॉ.जितेंद्र भाट यांनी दिलीपत्रकार परिषदेसाठी सह-समन्वयक प्रा.प्रसाद जाधव,विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा कमलाकर,अथर्व वैद्य, शार्दूल सपकाळ आदी उपस्थित होते.