महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांता सरकारी मदत देण्यासंबंधीचे दोन प्रस्ताव होते. पन्हाळा तालुक्यातील कारवे येथील संदीप निवास खामकर व शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील कुमार बाबू पोवार या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचे प्रस्ताव पात्र ठरविले. हा प्रस्ताव सरकारकडे पाठवून रितसर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
साधारणपणे महिना ते दीड महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणार आहे. एक लाख रुपयांपैकी 30 हजार रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यात टाकले जातात आणि 70 हजार रुपये मासिक प्राप्ती योजनेमध्ये लाभार्थ्याच्या नावे बँकेत ठेवले जातात.असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील तहसिलदार विजय पवार यांनी सांगितले.