Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 22 ऑगस्टला जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावाहसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहनपाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध

जाहिरात

 

कोल्हापुरात 22 ऑगस्टला जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावा

schedule20 Aug 26 person by visibility 17 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समिती - कोल्हापूर यांच्यावतीने 22 ऑगस्ट 2026 रोजी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतीभवन विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे दुपारी दोन वाजता जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावा आयोजित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त्त विना अनुदानित /अंशतः अनुदानित, कायम आस्थापनेवरील, नियमित वेतन श्रेणीतील व तद्नंतर १०० टक्के अनुदान प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक / कर्मचाऱ्यांना देय १९८२ ची जुनी पेन्शन योजना नियनित करणेबाबत गेली अनेक वर्षे सरकारी स्तरावर तसेच काही पेन्शन पिडीत बांधव सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करीत आहेत. नऊ-दहा वर्षे विनाअनुदानित सेवा करून तदनंतर १०० टक्के अनुदानांवरती कार्यरत आहेत. यापैकी हजारो शिक्षक-कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर विना पेन्शन जीवन जगत आहेत. राज्यातील सुमारे २६००० शिक्षक / कर्मचाऱ्यांना देय जुनीच १९८२ ची पेन्शन योजना नियमित करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पेन्शनचा निर्णायक लढा कोल्हापूर मधून सुरु करण्याचा निर्धार करून हजारो पेन्शन पिडीत बांधवांचा हा एल्गार मेळावा आयोजित करीत आहोत. या मेळाव्याच्या नियोजनासाठी दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील,  सुरेश संकपाळ,दत्ता पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes