नव मतदार - लाडकी बहीण योजनेला दक्षिणमध्ये प्रतिसाद
schedule09 Jul 24 person by visibility 846 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : माजी आमदार अमल महाडिक यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नव मतदार नोंदणी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थी नोंदणीसाठी बूथनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. एक जुलैपासून कोल्हापूर शहरात या शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात नव मतदार नोंदणी अभियानाला युवा वर्गातून उदंड प्रतिसाद लाभला. तसेच महाराष्ट्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाने पसंती दिली.
यासोबतच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आयुष्मान भारत योजना यासारख्या विविध योजनांची नोंदणी करण्यात आली होती. या शिबिरात तब्बल 30274 लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली. शहर परिसरात मिळालेल्या उदंड प्रतिसादनंतर या शिबिरांचे आयोजन दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत मध्येही आजपासून करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा तसेच नव मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून विकसित भारतासाठी मतदान करावे असे आवाहन माजी आमदार अमल महाडिक यांनी केले आहे.
विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक माता-भगिनी पर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे महाडिक म्हणाले. अंगणवाडी सेविका, महा-ई-सेवा केंद्र तसेच शासनाच्या प्रतिनिधींकडेच महिलांनी नोंदणी करावी असे आवाहन महाडिक यांनी केले.
संपूर्ण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून एक लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची तयारी केली असल्याचं माजी आमदार अमल महाडिक म्हणाले.
प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे याच ध्येयाने सर्व यंत्रणा काम करत आहे. नागरिकांनीही वेळेत नोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन महाडिक यांनी केले.