चर्च गेट रेल्वे स्थानकाला अहिल्याबाई होळकरांचे नाव द्या -यशवंत ब्रिगेड
schedule10 Jul 24 person by visibility 573 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चर्चगेट रेल्वे स्थानकाचे महाराणी अहिल्याबाई होळकर असे नामकरण करावे अशी मागणी यशवंत ब्रिगेडने केली आहे. यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष प्रा. संतोष कोळेकर यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यासंबंधी निवेदन दिले.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘ मुंबई येथील चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नामकरण महाराणी अहिल्याबाई होळकर असे करण्यात यावे . आपण मुंबईच्या सात रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दूसरे नामकरण करणार आहात असे घोषित केले आहे. तेव्हा चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नामकरण महाराणी अहिल्याबाई होळकर असे करावे.’