कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालकपदी माणिक वाघमारे
schedule19 Aug 23 person by visibility 815 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागाच्या उपसंचालकपदी माणिक वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीचे उपसंचालक संजय सबनीस यांच्या बदलीमुळे हे पद रिक्त होते. दरम्यान वाघमारे हे सध्या सांगली येथे जिल्हा क्रीडा अधिकारी होते.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माणिक वाामारे यांच्या कारकिर्दीची सुरुवात क्रीडा शिक्षक म्हणून झाली. ऑक्टोबर २०१२ मध्ये त्यांची गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. २०१२ ते २०१५ या कालावधीत ते गडचिरोली येथे होते कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून २०१५ ते २०१८ या कालावधीत काम केले. २०१८ ते २०२३ या कालावधीत ते सांगली येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वाघमारे हे मूळचे जत तालुक्यातील रामपूर येथील आहेत.