गोकुळमध्ये महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
schedule02 Oct 24 person by visibility 191 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघातर्फे ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती साजरी करण्यात आली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, महात्मा गांधी यांनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शक आहेत.माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देवून जवान आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला. अशा या थोर व्यक्तींचे देशाच्या जडणघडणी मध्ये लाखमोलाचे योगदान आहे.”
यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. पी. जे. साळुंखे, डॉ. दळवी, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुंरबेकर, दत्तात्रय वागरे, बी.आर.पाटील, बी. एस. मुडकशिवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर उपस्थित होते.