Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचे संचालक विश्वास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला कार्यक्रमकोल्हापुरात महायुतीचं सेलिब्रेशन…! कोल्हापुरी फेटा, नगसेवकांचा सत्कार अन् केक कापून आनंदोत्सव ! !सकारात्मक अभिव्यक्तीतून माणूसपण घडते : डॉ. आलोक जत्राटकरक्रिडाई कोल्हापूरतर्फे दालन मंडप उभारणीस प्रारंभ२३ माजी नगरसेवक विजयी ! २९ माजी नगरसेवक पराभूत !!पुढील वर्षी आनंदराव पाटील चुयेकरांच्या स्मृतिदिनी २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करणारकोल्हापूर महापालिकेतील ८१ जागेवरील विजयी उमेदवारकोल्हापूर महापालिकेत सत्तांतर, महायुतीला 45 जागा ! काँग्रेसचे 34 उमेदवार विजयी !!घघ मणकोल्हापूर महापालिकेसाठी सुमारे 70 टक्के मतदान

जाहिरात

 

महाराष्ट्र न्यूज वनची पाच वर्षाची यशस्वी वाटचाल ! व्हिजीटर्सची संख्या एक कोटीच्या घरात !!

schedule04 Jul 25 person by visibility 930 categoryसंपादकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वस्तुनिष्ठपणा, विश्वासार्हता, अचूकता आणि आजच्या घटना आजच बातमीच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचविणारे एक प्रभावी माध्यम म्हणजे ‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम.’हे न्यूज पोर्टल. अल्पावधीतच वाचकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं आणि पसंतीस उतरलेलं ऑनलाइन माध्यमातील हे न्यूज पोर्टल आज कोल्हापुरातील आघाडीचे न्यूज पोर्टल बनले आहे. पाच जुलै २०२० रोजी सुरु झालेल्या या न्यूज पोर्टलचा शनिवारी (पाच जुलै २०२५) रोजी पाचवा वर्धापनदिन. पाच वर्षाची यशस्वी वाटचाल करुन दिमाखात सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या पाच वर्षात या न्यूज पोर्टलची व्हिजीटर्सची (वाचक संख्या) एक कोटीच्या घरात पोहोचली आहे.

 माध्यम जगतातील नवं नवे बदल अंगिकारत ‘महाराष्ट्र न्यूज पोर्टल’ची वाटचाल सुरू आहे. अवतीभवतीच्या घडामोडी, राजकीय घटना, सांस्कृतिक समारंभ, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी, शिक्षण क्षेत्रातील बदल, विस्तारणारे उद्योग क्षेत्र, वैद्यकीय सेवेचा वसा, बांधकाम व्यवसायातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प, सरकारी योजना अशा सर्वंकष विषयाशी संबंधित वृत्तलेखन हे या न्यूज पोर्टलचे वैशिष्ट्य. तंत्रज्ञानातील क्रांतिमुळे अवघ्या काही सेकंदात जगभरातील माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. त्याला माध्यम जगत ही अपवाद राहिले नाही. यू ट्यूब, न्यूज पोर्टलची संख्या मोठी आहे. या नवं माध्यमात ‘महाराष्ट्र न्यूज वन.कॉम’ने पहिल्यापासून वेगळेपण जपले. वृत्तसंकलनपासून विविध विषयावरील वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यापर्यंत, दैनंदिन घडामोडीपासून ते जाहीर समारंभापर्यंतचे सगळया कार्यक्रमाचे नेटके वृत्ताकंन करण्यावर भर दिला.

राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रातील घडामोडी, प्रस्तावित योजना वाचकांपर्यंत पोहोचविण्याला प्राधान्य दिले. विश्वासार्हता, वस्तुनिष्ठपणा, अचूकता आणि आजच्या घटना आजच बातमीच्या माध्यमातून वाचकांपर्यत पोहोचविण्याची खासियत हे ‘महाराष्ट्र न्यूज वन’चे बलस्थान होय. वाचकांचे प्रेम आणि जाहिरातदारांची साथ लाभल्यामुळे पाच वर्षात ‘महाराष्ट्र न्यूज वन’हे कोल्हापूरकरांच्या आवडीचे माध्यम ठरले आहे. वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाच वर्षाचा टप्पा पूर्ण करताना वाचक संख्या एक कोटीच्या घरात पोहोचली आहे. यावरुन लोकांचा वाढता प्रतिसाद स्पष्ट होता. वाचक आणि जाहिरातदारांच्या पाठबळावरच सहाव्या वर्षात दिमाखात पदार्पण होत आहे. या पुढील काळातही हेच प्रेम, सहकार्य पाठबळ कायम राहिल असा विश्वास आहे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या साऱ्यांचे ‘महाराष्ट्र न्यूज वन. कॉम’च्या व्यवस्थापनतर्फे आभार !

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes